VIDEO : मॉक ड्रिल करताना ट्रेनरने दुसऱ्या मजल्यावरून दिला धक्का, विद्यार्थिनीचा मृत्यू

VIDEO : मॉक ड्रिल करताना ट्रेनरने दुसऱ्या मजल्यावरून दिला धक्का, विद्यार्थिनीचा मृत्यू

तामिळनाडूतील कोयंबतूर येथील एका महाविद्यालयात, मॉक ड्रिल करताना एका विद्यार्थीनीचा मृत्यू झाला आहे.

  • Share this:

तमिळनाडू, 13 जुलै : तामिळनाडूतील कोयंबतूर येथील एका महाविद्यालयात, मॉक ड्रिल करताना एका  विद्यार्थीनीचा मृत्यू झाला आहे. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. सुत्रांच्या माहितीनुसार, प्रशिक्षकाने विद्यार्थीनीला महाविद्यालयाच्या दुसऱ्या मजल्याच्या छतावरून खाली ढकललं. यात तिचा मृत्यू झाला. गुरूवारी दुपारी पोलिसांनी या प्रशिक्षकाला ताब्यात घेतलं आहे.

कवी आझादांच्या मृत्यूवर मोठा खुलासा, डॉक्टर म्हणाले '...तर आज ते जिवंत असते'

19 वर्षांच्या एन. लोगेश्वरीला मॉक ड्रिल करताना महाविद्यालयाच्या दुस-या मजल्यावरून उडी मारण्याची इच्छा नव्हती, पण प्रशिक्षक आर. अरुमगम यानी तिला धक्का दिला आणि खाली ढकलले. या घटनेदरम्यान लोगेश्वरी झेलण्यासाठी विद्यार्थ्यांचा संघ खाली जाळी घेऊन उभा होता. जेव्हा लोगेश्वरीला धक्का देण्यात आला तेव्हा ती खाली पडताना ती अती वेगाने छतावर आदळली आणि त्याने तिला गंभीर दुखापत झाली. तिला रुग्णालयात नेल्यानंतर डॉक्टरांकडून तिला मृत घोषित करण्यात आलं.

कोवई कलाई मंगल कॉलेज ऑफ आर्ट्स अॅन्ड सायंस या कॉलेजमधला हा सगळा प्रकार कॅमेऱ्यात कैद झाला आहे. पोलिस आता या प्रकाराचा तपास करत आहेत.

हेही वाचा

मल्टिप्लेक्समध्ये बाहेरील खाद्यपदार्थ घेऊन जाता येणार

लंडनमध्ये मारहाण केल्याप्रकरणी नवाज शरीफ यांच्या नातवंडांना अटक

First published: July 13, 2018, 1:40 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading