गोव्यात रात्रीचा खेळ सुरूच, पावसकर यांचाही शपथविधी उरकला

गोव्यात रात्रीचा खेळ सुरूच, पावसकर यांचाही शपथविधी उरकला

'मगोप'मधून भाजपात आलेल्या दीपक पावसकर यांनी मध्यरात्री मंत्रिपदाची शपथ घेतली.

  • Share this:

पणजी, 28 मार्च : गोव्याचं राजकारण, राजकीय घडामोडी आणि रात्र यांचं नातं घट्टच होताना दिसत आहे. राज्यातील राजकारणात रात्रीचा खेळ आता चर्चेचा विषय झाला आहे. मुख्यमंत्र्यांचा शपथविधी, त्यानंतर मगोप मधून दीपक पावसकर यांचा भाजपात प्रवेश आणि पुन्हा त्यांना मंत्रिपदाची शपथ हे सर्व रात्रीचं घडलं.

मगो पक्षातून भाजपातून आलेल्या दीपक पावसकर यांना मध्यरात्री मंत्रिपदाची शपथ घेतली . सध्या मगो पक्ष ' ढवळीकर बंधू ' खाजगी मालमत्ता म्हणून चालवीत असल्याची टीका पावसकर यांनी केली.

गोव्यात माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रिकरांच्या निधनानंतर अनेक राजकीय घडामोडी घडल्या. गोव्याचे मुख्यमंत्री म्हणून डॉ. प्रमोद सावंत यांनी मध्यरात्रीच शपथ घेतली होती.

सध्याच्या विद्यमान सावंत सरकारमध्ये असलेल्या मगो पक्षाने युतीचा धर्म न पाळता शिरोडा विधानसभा जागेवर पक्षाचे अध्यक्ष दीपक ढवळीकर यांना उभे केल्याने भाजपाने त्यांच्याच दोन आमदारांना भाजपात घेऊन ढवळीकर यांच्यावर कुरघोडी केली. दुसरीकडे पक्षाचे नेते सुदीन ढवळीकर यांना घरचा रस्ता दाखवत नव्याने भाजपात दाखल झालेल्या दीपक पावसकर यांना मंत्री केलं आहे . त्यांना राज्यपाल डॉ मृदुला सिन्हा यांनी पद आणि गोपनीयतेची शपथ दिली .यावेळी मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत आणि इतर मंत्री उपस्थित होते. या शपथविधी सोहळ्यानंतर पावसकर यांनी ढवळीकर यांच्यावर कडवट टीका केलीय

नव्याने शपथ घेतलेल्या आणि जुन्या मंत्र्यांना उद्या खातेवाटप केलं जाणार आहे . या घडामोडी नंतर ढवळीकर बंधू आणि मगोची भूमिका काय असेल हे पाहावं लागणार आहे.

VIDEO: ट्रॅफीकमुळे पार्थ पवारांना झाला उशीर, पाहा काय केलं

First published: March 28, 2019, 8:47 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading