रस्त्यावर फिरताना दिसला डायनोसॉर, हा खतरनाक VIDEO पाहून तुम्हीही घाबराल

रस्त्यावर फिरताना दिसला डायनोसॉर, हा खतरनाक VIDEO पाहून तुम्हीही घाबराल

16 कोटी वर्षांनंतर आता पुन्हा रस्त्यावर फिरताना दिसला डायनोसॉर?, पाहा हा धक्कादायक VIDEO.

  • Share this:

डायनोसॉर हे खरेतर इतिहासपूर्व काळातील पृथ्वीवरील सरपटणारे प्राणी व पक्षी. सुमारे 16 कोटी वर्षांपूर्वी डायनोसॉर प्राण्यांचे पृथ्वीवर वर्चस्व असल्याची माहिती आहे. मात्र अमेरिकेत चक्क रस्त्यावर डायनोसॉर फिरताना पाहायला मिळाला. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

अमेरिकेतील रस्त्यावर एका डायनोसॉर फिरताना दिसत असून लोकांना घाबरवण्याचे काम सुरू आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर हा प्रॅंक (फसवणूक) असल्याचे लक्षात आले. प्रॅंक व्हिडीओमध्ये तुम्हाला घाबरवले जाते. या व्हायरल व्हिडीओमध्ये खरं तर हा डायनॉसॉर नसून तसे कपडे घातलेला प्रसिध्द प्रॅंक मास्टर गोब्रान बहोऊ आहे. गोब्रान हा प्रॅंक करण्यासाठी जगप्रसिध्द आहे, अशीच मस्करी त्यानं डयनोसॉरचे कपडे घालून केली. गोब्रान एका छोटा टायरानोसोरस रेक्ससारखे (Tyrannosaurus Rex) कपडे घालून लोकांना घाबरवत होता.

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, गोब्रान लोकांना मजेशीरप्रकारे घाबरवण्याचा प्रयत्न करत आहे. डायनोसॉर बनून अचानक गोब्रान लोकांना घाबरवत होता, काही लोकांनी तर पळण्यास सुरू केली तर, काही तिकडेच पडले.

हा व्हिडीओ टिकटॉक आणि इन्स्टाग्रामवर शेअर करण्यात आला आहे. त्यानंतर ट्विटरवर हा व्हिडीओ व्हायरल झाला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 24, 2019 09:46 AM IST

ताज्या बातम्या