डिंपल दुगर यांची वाहतूक संघाच्या उपाध्यक्षपदी निवड

डिंपल दुगर यांची वाहतूक संघाच्या उपाध्यक्षपदी निवड

निर्माता दिग्दर्शक डिंपल दुगर यांची राष्ट्रीय पातळीवरील वाहतूक संघाच्या उपाध्यक्षपदी निवड झाली.

  • Share this:

नवी दिल्ली, 25 मार्च : निर्माता दिग्दर्शक डिंपल दुगर यांची राष्ट्रीय पातळीवरील वाहतूक संघाच्या उपाध्यक्षपदी निवड झाली. यापूर्वी जानेवारीमध्ये केंद्रीय परिवहनमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते नितीन गडकरी यांनी नवीन भारतीय शिववाहतूक संघाची स्थापना केली. यामधे 7.5 लाख सदस्य आहेत. त्यासोबत गडकरी यांनी लेडीज ट्रॉन्सपोर्ट विंगच्या राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष म्हणून बॉलिवूड अभिनेत्री ईशा कोप्पीकर यांची नियुक्ती केली.

34 वर्षीय डिंपल ह्या उद्योजक आणि प्रेरणादायी चित्रपटाच्या निर्मात्या म्हणून कार्यरत आहेत. त्याचबरोबर त्या आंतरराष्ट्रीय ग्रॅज्युएट स्टुडंट्स संघटनेच्या अध्यक्ष आहेत. त्यांना कोलकाता पोलिस वाहतूक वॉर्डन ऑफिसरच्या वतीने द फोर्स सर्व्हिस आणि सर्वोकृष्ट प्रशिक्षणार्थी पुरस्कार प्रदान केला गेला आहे. डिंपल यांची चित्रपटसृष्टीची कोणतीही पार्श्वभूमी नसताना चित्रपटसृष्टीमध्ये मोलाचे काम केले आहे. त्यांनी न्यूयॉर्क इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी मध्ये एमबीए फायनान्स मध्ये 100 टक्के गुण मिळवले.

2008 मध्ये वयाच्या 21व्या वर्षी त्यांनी आपलं जीवनचरित्र प्रकाशित केलं त्यासाठी त्यांना 'हूज हू अमंग स्टुडंट्स इन अमेरिका' संस्थेने अमेरिकेतला मानाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्याचसोबत त्यांनी जेव्हीडी फिल्म्स आणि पिक्सलन्स स्टुडिओची स्थापना करून इंडियन टेलीव्हिजन जगतामध्ये नावलौकिक मिळवला.

First published: March 25, 2019, 9:33 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading