'राम मंदिर हिंदू धर्मगुरु उभारतील, तुमचे पैसे तुमच्याकडेच ठेवा'

'राम मंदिर हिंदू धर्मगुरु उभारतील, तुमचे पैसे तुमच्याकडेच ठेवा'

राम मंदिराच्या उभारणीवरून काँग्रेसचे नेते आणि मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंग यांनी भाजप आणि विश्वि हिंदू परिषदेवर टीका केली आहे.

  • Share this:

भोपाळ, 05 जानेवारी : राम मंदिराच्या उभारणीवरून काँग्रेसचे नेते आणि मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंग यांनी भाजप आणि विश्वि हिंदू परिषदेवर टीका केली आहे. प्रभू रामचंद्र हे सर्वांचे आहेत. त्यांचं मंदिर हे हिंदू धर्मगुरूंनी बांधायला हवं. राजकीय पक्षांशी संबंध असलेल्या संघटनांनी यापासून दूर रहायला पाहिजे. राम मंदिर उभारणीची जबाबदारी रामालय ट्रस्टला द्यावी असं म्हटलं आहे.

काँग्रेस नेते दिग्विजय सिंग यांनी भाजप आणि विहिंपवर निशाणा साधवा आहे. राम मंदिराची उभारणी ही हिंदू धर्मगुरुंनी करावी. भगवान श्रीराम हे सर्वांचेच असून मंदिर उभारण्याची जबाबदारी रामालय ट्रस्टला देण्यात यावी अशी मागणी करणारे ट्विट सिंग यांनी केली आहे.

रामालय ट्रस्टमध्ये सर्व शंकराचार्य आणि रामानंदी संप्रदायाशी संबंधित आखाडा परिषदेचे सदस्य आहेत. तसेच जगद्गुरु स्वामी स्वरुपानंदजी सर्वात वरिष्ठ असल्याने तेच अध्यक्ष आहेत. रामालय ट्रस्टच्या माध्यमातूनच राममंदिर उभा करावं असं त्यांनी म्हटलं आहे.

दिग्विजय सिंग म्हणाले की, सरकारी तिजोरीतील पैसा वापरून राम मंदिर बांधणी नको. जगभरातील हिंदू प्रभू रामचंद्रांना देवाचा अवतार मनानतात. तेच लोक मंदिर उभारणीसाठीही मदत करतील. विहिंपने मंदिर निर्मितीसाठी जे पैसे गोळा केले त्यांनी त्यांच्याकडेच ठेवावेत. त्याचा वापर समाजातील अनिष्ट प्रथा नष्ट करण्यासाठी करावा. असंही त्यांनी सांगितलं.

राम मंदिराची उभारण्याची जबाबदारी आमच्याकडे दिली तर आम्ही सरकारकडून यासाठी पैसे घेणार नाही. लोकांच्या मदतीनेच मंदिर उभारलं जाईल असं स्वामी स्वरुपानंद याआधी म्हणाले होते.

भाजपबरोबर काँग्रेसनेही केली पाकविरोधी निदर्शनं; 'आप'नेही नोंदवला निषेध

Published by: Suraj Yadav
First published: January 5, 2020, 12:06 PM IST
Tags: Ram Mandir

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading