मराठी बातम्या /बातम्या /देश /

Digital Prime Time : मला आई व्हायचय, झालेही; त्यासाठी लग्न अन् नवरा कशाला हवाय?

Digital Prime Time : मला आई व्हायचय, झालेही; त्यासाठी लग्न अन् नवरा कशाला हवाय?

हा नवा बदल आहे. प्रत्येकालाच तो आवडेल, जमेल, रुचेल असं नाही. पण अशा वेगळ्या वाटेवरून जाण्याऱ्या महिलांच्या पाठिशी उभं राहू शकत नसलो तरी त्यांच्या निर्णयाचं कौतुक तर करायला हवं.

हा नवा बदल आहे. प्रत्येकालाच तो आवडेल, जमेल, रुचेल असं नाही. पण अशा वेगळ्या वाटेवरून जाण्याऱ्या महिलांच्या पाठिशी उभं राहू शकत नसलो तरी त्यांच्या निर्णयाचं कौतुक तर करायला हवं.

हा नवा बदल आहे. प्रत्येकालाच तो आवडेल, जमेल, रुचेल असं नाही. पण अशा वेगळ्या वाटेवरून जाण्याऱ्या महिलांच्या पाठिशी उभं राहू शकत नसलो तरी त्यांच्या निर्णयाचं कौतुक तर करायला हवं.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Meenal Gangurde

ही कथा आहे एली नावाच्या तरुणीची. तिला लग्न करायचं नव्हतं, मात्र आई होण्याची इच्छा होती. यासाठी तिने ऑनलाइन एक स्पर्म डोनर शोधला. आणि त्याच्या मदतीने ती आई झाली. आजही ती आनंदात आहे. ही इंग्लंडमधील घटना असली तरी अनेक देशांमध्ये हा ट्रेंड वाढू लागला आहे. त्यात इंग्लंडमध्ये लग्नाशिवाय आई होणाऱ्या महिलांचं प्रमाण अधिक असल्याचं सांगितलं जातं.

भारतातही अनेक महिला लग्न न करता आई होऊ इच्छितात. याचं प्रमाण श्रीमंत घरांमध्ये अधिक पाहिलं जात असलं तरी सर्वसामान्य घरांमधील महिलादेखील आता असा विचार करू लागली आहेत. अर्थात त्यांना समाजाची बोचणारी नजर सहन करावी लागते.

सध्याच्या महिला या आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी आहेत. महिला जर एकटीने एखादी कंपनी चालवू शकते, तर ती एकटीनं मुलाला वाढवू शकत नाही का? विशेष म्हणजे सर्व गाढा स्वत: ओढत असताना तिला तिच्या आयुष्यातील निर्णय घेण्याचे अधिकारही दिले जात नाही.  जर एखाद्या महिलेला लग्न करावस वाटत नसले तर तिच्यावर बंधंन लादण्याची गरज काय? सोबतीसाठी तिला स्वत:च मूल हवं असेल तर काय हरकत आहे.

मात्र अजूनही आपल्याकडे कधी सुरक्षेच्या कारणास्तव किंवा अपरिपक्व असल्याचं सांगून महिला एकटीने सर्व सांभाळू शकत नाही, असच लेबलिंग केलं जातं. आपल्याकडे अशी अनेक उदाहरणं आहेत, जिथं महिलांनी एकटीनं मुलांना मोठं केलंय. घटस्फोट झाल्यानंतरही अनेकदा कोर्ट आईकडेच मुलाला सांभाळण्याचे अधिकार देतात. जी गोष्टी महिला घटस्फोटानंतर करू शकते, तेच काम लग्न न करता तर सहज शक्य आहे.

लग्न न करता मूल वाढवता येतं, उदाहरणार्थ...

वेस्टइंडिजमधील प्रसिद्ध क्रिकेट विवियन रिचर्ड याच्यासोबत अभिनेत्री नीना गुप्ता यांचे प्रेसंबंध होते. Wedlock पद्धतीने मसाबाचा जन्म झाला. नीना गुप्ता यांनी एकटीने मुलीला मोठं केलं. आपलं नाव लावलं. आज मसाबा एक प्रसिद्ध फॅशन डिझायरन आहे. आजही समाजाला वाटतं की, महिला एकटीनं घर, मुलं, आर्थिक व्यवहार सांभाळू शकत नाहीत. मात्र नीना गुप्ताने ते केलय. त्यांनी समाजाच्या नैतिकतेच्या चौकटीचा विचार केला नाही. आज त्यांनी मुलीलाही तितकच स्वावलंबी बनवलं आहे. एका मुलाखतीत नीना गुप्ता यांनी सांगितलं होतं की, मसाबाच्या जन्मानंतर लोकांचा त्यांच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला. या घटनेनंतर त्यांना निगेटिव्ह भूमिका ऑफर केल्या जाऊ लागल्या. मात्र तरीही त्या काम करीत राहिल्या. 'A Strong Woman is Bad woman in India'असं म्हटलं जातं.

कोणाचाही फार विचार न करता. आज वेगळ्या धाटणीचे चित्रपट साकारणारी अभिनेत्री म्हणून नीना गुप्ता यांच्याकडे पाहिलं जातं. मनोरंजन क्षेत्रातील आणखी एक प्रसिद्ध नाव म्हणजे एकता कपूर. एकता कपूरदेखील सिंगल मदर आहे. तिने लग्न केलं नाही. सरोगसीच्या मदतीने ती आई झालीये. आज टिव्हीची क्वीन म्हणून एकता कपूरकडे पाहिलं जातं. एकता अनेकदा आपल्या मुलासोबतचे फोटो सोशल मीडियावरुन शेअर करते. अभिनेत्री कल्की कोचिन हिनेदेखील विवाहित नसताना 2020 मध्ये एका गोंडस मुलीला जन्म दिला. ती सध्या हर्शबगसोबत रिलेशनशीपमध्ये आहे. मात्र त्यांनी अद्याप लग्न केलेलं नाही. 2015 मध्ये कल्की आणि अनुराग कश्यप यांनी घटस्फोट घेतला होता.

ही झाली सेलिब्रिटींची उदाहरणं. मात्र सर्वसामान्य कुटुंबातील महिलेदेखील असा विचार करीत असल्याचं दिसतं. मात्र सामाजिक स्वीकारहार्यता नसल्यामुळे लग्नाशिवाय मूल होण्यासारखं बोल्ड पाऊल उचलण्याचं त्यांचं धाडस होत नाही. मात्र गेल्या काही दशकात परिस्थितीत बदलली आहे. आर्थिकदृष्ट्या स्वावलंबित्व आल्यामुळे तरुणी स्वत:च स्वत:चे निर्णय घेत आहेत. आणि त्याच्या परिणामांची जबाबदारी स्वीकारत आहेत.

अशा घटना समोर आल्या की, अनेकजणं संस्कृती धोक्यात आल्याचा ढोल बडवत राहतात. मात्र समाज आणि संस्कृती या दोन्ही एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. शिवाय संस्कृती कायम प्रवाही असते. अगदी नदीसारखी. नदीत साचलेपण आलं तर त्याचा नाला होण्याची भीती असते.

टीप - हा नवा बदल आहे. प्रत्येकालाच तो आवडेल, जमेल, रुचेल असं नाही. पण अशा वेगळ्या वाटेवरून जाण्याऱ्या महिलांच्या पाठिशी उभं राहू शकत नसलो तरी त्यांच्या निर्णयाचं कौतुक तर करायला हवं. महिला सबलीकरण म्हटल्यानं बदल होणार नाही. या छोट्या छोट्या गोष्टीतूनही त्यांना बळ मिळत असतं.

First published:

Tags: Bollywood actress, Digital prime time, Mother, Parents and child