हिंदू-मुस्लीम रुग्णांसाठी वेगवेगळ्या वॉर्डच्या आदेशाबाबत गुजरात सरकारचा खुलासा

हिंदू-मुस्लीम रुग्णांसाठी वेगवेगळ्या वॉर्डच्या आदेशाबाबत गुजरात सरकारचा खुलासा

रुग्णांचे वय व लक्षणांनुसार त्यांना वेगवेगळ्या वॉर्डमध्ये ठेवण्यात आल्याचे गुजरात सरकारने सांगितले आहे

  • Share this:

नवी दिल्ली/अहमदाबाद, 15 एप्रिल : देशात दररोज कोरोना व्हायरसची (Coronavirus) रुग्णसंख्या वाढत आहे. आता तर संसर्ग झालेल्यांचा आकडा 11000 पार गेला आहे. रुग्णसंख्या सातत्याने वाढत असल्याने रुग्णालयांवरही ताण येत आहे.

यादरम्यान गुजराजच्या (Gujrat) अहमदाबादस्थित एका रुग्णालयात कोरोना रुग्णांना धार्मिक आधारावर वेगवेगळे कोविर्ड वॉर्ड (Covid - 19) बनवण्यात आल्याची बातमी समोर आली होती. मात्र गुजरात सरकारने ही बातमी चुकीची असल्याचे सांगितले.

वैद्यकीय कंडिशननुसार त्यांना विविध वॉर्डात ठेवण्यात आले आहे. रुग्णांची लक्षणे, त्यांचे वय यादृष्टीने विविध वॉर्डात रुग्णांना हलविण्यात आले आहे, अशी माहिती गुजरातच्या आरोग्य विभागाने दिली आहे.

काय आहे संपूर्ण प्रकरण

Indian Express च्या रिपोर्टनुसार हे प्रकरण अहमदाबाद येथील सिव्हील रुग्णालयातील आहे. येथे कोरोनाचे रुग्ण आणि संशयितांना धर्माच्या आधारवर बेड दिला गेला आहे. या रुग्णालयात कोरोना रुग्णांसाठी 1200 खाटा पूरविण्यात आल्या आहे. रुग्णालयातील कोविड वॉर्डचं हिंदू-मुस्लीम रुग्णांमध्ये विभाजन करण्यात आलं आहे. म्हणजेच 600 खाटा हिंदू आणि 600 खाटा मुस्लीम रुग्णासांठी देण्यात आल्या आहेत, अशा स्वरुपाची बातमी प्रसिद्ध झाली होती. मात्र गुजरातच्या आरोग्य विभागाने ही बातमी फेटाळली असून अशा स्वरुपाचं विभाजन करण्यात आलं नसल्याचं त्यांचं म्हणणं आहे. या रुग्णालयात 186 कोरोना संशयितांना भरती करण्यात आलं आहे. आतापर्यंत यामध्ये 150 जणांची टेस्ट पॉझिटिव्ह आढळून आली आहे.

संबंधित -'

मुंबईची इटली होणार', बॉलिवूड अभिनेत्रीच्या बहिणीने व्यक्त केली भीती

लॉकडाऊनमध्ये धारदार शस्त्रानं वार, पाहा तरुणाच्या हत्येचा थरारक VIDEO

संपादन - मीनल गांगुर्डे

First published: April 15, 2020, 2:47 PM IST

ताज्या बातम्या