मुंबईच्या तरुणाने टाकला देशातला सर्वात मोठा दरोडा, डिझेलची पाईपलाईन फोडून लुटले अब्जावधीचं इंधन!

मुंबईच्या तरुणाने टाकला देशातला सर्वात मोठा दरोडा, डिझेलची पाईपलाईन फोडून लुटले अब्जावधीचं इंधन!

पोलिसांनी छापा मारून 4 जणांना अटक केली. त्यांच्याकडून 90 लाख 40 हजार रोख जप्त करण्यात आले आहे.

  • Share this:

संजय तिवारी, प्रतिनिधी

हैदराबाद, 17 जानेवारी : पाण्याच्या पाईपलाईनमधून अवैधरित्या पाणी चोरीच्या घटना आजपर्यंत तुम्ही ऐकल्या असतील. परंतु, हैदराबादमध्ये पेट्रोल-डिझेलची पाईपलाईन फोडून हजारो लिटर इंधन चोरी करण्याची घटना समोर आली आहे. या महाभागांनी डिझेलच्या पाईपलाईन फोडली आणि त्याला पाईप जोडून टँकर भरून पुरवठाही सुरू केला होता. तेलंगाणा आणि महाराष्ट्रामधील अनेक पेट्रोलपंपावर डिझेल विकले होते.

मुंबईत राहणाऱ्या हाफिज अजीज चौधरीने इंडियन ऑयल कॉर्पोरेशन आणि भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडच्या डिझेलच्या 2 पाईपलाईन चेर्लापल्लीहुन घटकेसर पर्यंत जात असल्याचं शोधून काढलं होतं.

त्यानंतर त्याने या पाईपलाईनला पाण्याच्या पाईपलाईनप्रमाणे छेद करून नवा पाईप जोडण्याची योजना आखली. हैदराबादमधील किसारा भागात त्याने यासाठी एक जमीन भाड्याने घेतली. या जमिनीखालून डिझेलची पाईपलाईन जात होती. नेमकं त्याच ठिकाणी त्याने एक शेड तयार केला आणि त्यानंतर पाईपलाईनाला भगदाड पाडून डिझेल चोरी सुरू केली.

परंतु, डिझेल पाईपलाईनाला छेद करणे सोपे काम नव्हते. कारण, जर पाईपलाईनवर ड्रील केलं तर त्यामुळे डिझेल मोठ्याप्रमाणात बाहेर पडले असते आणि आग लागली असती. त्यामुळे हाफीजने 12 जणांची टोळी तयार केली.

यामध्ये काही लोकं हे प्लम्बिंग आणि नळ दुरूस्त करणारे कुशल कारागीर होते. तर यातील काही जणांकडे टँकर होते. त्यानंतर अत्यंत हुशारीने त्यांनी या पाईपलाईनवर छेद पाडले आणि नव्या पाईपचे कनेक्शन जोडले. घरातच ओव्हरहेड टँकपर्यंत पाणी पोहोचवण्यासाठी घरात वापरणाऱ्या पंपाचा वापर सुरू केला. त्यानंतर पूर्ण प्रेशरने डिझेल काढणे सुरू केले.

12 जणांच्या या टोळीने दोन टँकर्सचा वापर केला आणि तेलंगाणा आणि महाराष्ट्राच्या सीमेवरील पेट्रोलपंपावर डिझेल विकले. या गँगने तब्बल 7 टँकर भरून विकले होते. पोलिसांना याचा सुगाव लागेपर्यंत त्यांनी 1.3 लाख किलो लिटर डिझेल चोरी केले होते. पोलिसांनी छापा मारून 4 जणांना अटक केली. त्यांच्याकडून 90 लाख 40 हजार रोख जप्त करण्यात आले आहे. इतर 8 आरोप फरार झाले असून पोलीस त्यांचा शोध घेत आहे.

====================

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jan 17, 2019 08:37 PM IST

ताज्या बातम्या