'सोनिया आणि राहुल गांधींना जेलमध्ये केव्हा टाकणार? काँग्रेस नेत्याचा पंतप्रधानांना सवाल

'सोनिया आणि राहुल गांधींना जेलमध्ये केव्हा टाकणार? काँग्रेस नेत्याचा पंतप्रधानांना सवाल

2G आणि कोळसा घोटाळ्यातही तुम्हाला कुणालाही अटक करता आली नाही. पण त्याचंही राजकारण केलं.

  • Share this:

नवी दिल्ली 24 जून :  काँग्रेसचे नेते अधीर रंजन चौधरी यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकार हल्लाबोल केला. निमित्त होतं राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरच्या चर्चेचं. चौधरी हे आक्रमक नेते म्हणून ओळखले जातात. काँग्रेसने त्यांची नुकतीच गटनेतेपदी नियुक्ती केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही त्यांचं कौतुक केलं होतं. चौधरी यांनी पंतप्रधानांना त्यांच्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचारातल्या भाषणांची आठवण करून देत निशाणा साधला.

चौधरी म्हणाले भ्रष्टाचाराच्या मुद्यावरून तुम्ही काँग्रेसविरुद्ध रान उठवलं होतं. पण 2G आणि कोळसा घोटाळ्यात तुम्हाला कुणालाही अटक करता आली नाही. तुम्ही सोनिया आणि राहुल गांधी यांना चोर म्हटलं. त्यांना जेलमध्ये टाकण्याची भाषा केली. मग आता तुम्ही सत्तेत आला आहेत. त्यांना जेलमध्ये केव्हा टाकणार आहेत? असा सवालही त्यांनी केला. त्यांची जागा तर जेलमध्ये असेल तर ते सभागृहात कसे उपस्थित आहेत असंही त्यांनी सुनावलं.

काँग्रेसच्या सर्व राज्य समित्या बरखास्त

काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देण्यावरून राहुल गांधी ठाम आहेत. सर्व ज्येष्ठ नेते त्यांचं मन वळविण्याचा प्रयत्न करताहेत मात्र ते कुणालाही दाद देत नाहीत. किमान एक महिना तरी पदावर कायम राहण्याची विनंती फक्त त्यांनी मान्य केली. हा घोळ सुरू असतानाच फेररचना करण्यासाठी सर्व राज्यांच्या काँग्रेस समित्या बरखास्त करण्यात आल्या आहेत. आता विधानसभा निवडणुका असल्याने काँग्रेसला तातडीने फेररचना करत संघटनेत नवी उर्जा निर्माण करावी लागणार आहे.

या नावांची अध्यक्षपदासाठी चर्चा

लोकसभा निवडणुकीत झालेला पराभव आणि त्यानंतर काँग्रेसचा पुढील अध्यक्ष हा गांधी कुटुंबाबाहेरील असावा असं राहुल गांधी यांनी म्हटलं. त्यामुळे काँग्रेसचा पुढील अध्यक्ष कोण? याकडे सर्वाच्या नजरा लागल्या आहेत. राहुल गांधी यांनी दिलेल्या अल्टिमेटमनंतर काँग्रेस वर्किंग समिती काही नावांवर चर्चा करत आहे. राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्या नावावर शिक्कामोर्बत होणार अशी माहिती सुत्रांनी दिली आहे. पण, सुशिलकुमार शिंदे, मल्लिकार्जून खर्गे, माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह, अशोक गेहलोत आणि सचिन पायलट यांची नावं देखील चर्चेत आहेत. पण, या सर्वांना मागे टाकत अशोक गेहलोत यांच्या नावावर शिक्कामोर्बत होणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. अशोक गेहलोत यांच्या मदतीसाठी कार्यकारी अध्यक्षांची देखील नियुक्ती केली जाण्याची शक्यता आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Jun 24, 2019 04:21 PM IST

ताज्या बातम्या