Home /News /national /

तुम्ही 'या' नेत्याला ओळखलं का? सप्टेंबरपासून आहे नजरकैदेत

तुम्ही 'या' नेत्याला ओळखलं का? सप्टेंबरपासून आहे नजरकैदेत

फोटोमध्ये दिसत असलेला नेतो कोण आहे हा प्रश्न तुम्हाला सहज पडला असेल. कदाचित तुम्ही त्याला एका क्षणात ओळखाल. पण...

    नवी दिल्ली, 5 मार्च :  गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यामध्ये  जम्मू आणि काश्मिरमधील काही नेत्यांना नजर कैदेत ठेवण्यात आलं आहे. यामध्ये एक दोन नव्हे तर तीन नेत्यांचा समावेश आहे. हे नेते केवळ एकाच राजकीय पक्षाचे नाही तर वेगवेगळ्या राजकीय पक्षांचे आहेत. देशाच्या आणि त्या प्रांताच्या दृष्टीने अतिशय महत्वाचा असा निर्णय केंद्र सरकारने घेतला ज्याला देशाच्या काही भागात विविध राजकीय पक्षांनी मोठा विरोध केला होता. पण सर्व प्रकारचा विरोध मोडून काढत केंद्र सरकारने लोकसभेतल्या बहुमताच्या जोरावर देशाच्या शिरपेचाशी संबंधित कलम 370 संदर्भातला निर्णय घेतलाच. कोण आहे तो नेता? या फोटोमध्ये दिसत असलेला नेतो कोण आहे हा प्रश्न तुम्हाला सहज पडला असेल. कदाचित तुम्ही त्याला एका क्षणात ओळखाल. पण, अनेक जणं या नेत्याला या रुपात पाहून एकदम आश्चर्यचकित होतील यात शंकाच नाही. फोटोमध्ये दिसणारा हा नेता आहे जम्मू-काश्मिरच्या नॅशनल कॉन्फरन्स या पक्षाचे ओमर अब्दुल्ला. ओमर अब्दुल्ला हे जम्मू काश्मिरचे ११ मुख्यमंत्री होते. केंद्र सरकारने जम्मू काश्मिरमध्ये देशाच्या स्वातंत्र्यापासून लावण्यात आलेलं कलम ३७० हटवल्यानंतर ओमर अब्दुल्ला यांच्या नॅशनल कॉन्फरन्स पक्षाने त्याला जोरदार विरोध केला होता. त्यांचे वडील आणि खासदार फारुख अब्दुल्ला यांच्यासह ओमर अब्दुल्ला यांना ऑगस्ट २०१९ पासून त्यांच्या राहत्या घरात नजरकैदेत ठेवण्यात आलं आहे. ओमर अब्दुल्ला यांच्यासह जम्मू काश्मिरच्या माजी मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांना सुद्धा सरकारी विश्रामगृहात नजर कैदेत ठेवण्यात आलं आहे. काही दिवसांपूर्वी डॉक्टरांनी त्यांची तपासणी केली होती. आज सोशल मीडियात व्हायरल झालेला फोटो आजचा असून त्याची मोठी चर्चा सोशल मीडियात सुरू आहे. केंद्र सरकारच्या नव्या कायद्यानुसार, जी व्यक्ती आपल्या भडकाऊ भाषणामुळे कोणत्याही राज्यासाठी नुकसान करणारी ठरू शकते त्या व्यक्तीला अटक करण्याचा सरकारला अधिकार आहे. या नव्या कायद्यानुसारच ओमर अब्दुल्ला, फारुख अब्दुल्ला आणि मेहबुबा मुफ्ती यांना अटक करण्यात आली आहे आणि अद्याप त्यांची सुटका होईल अशी शक्यता दिसत नाही.
    Published by:Manoj Khandekar
    First published:

    पुढील बातम्या