गलवान खोऱ्यात भारतीय जवानांकडे शस्त्रे होती का? राहुल गांधींच्या प्रश्नाला परराष्ट्र मंत्र्यांचा खुलासा

गलवान खोऱ्यात भारतीय जवानांकडे शस्त्रे होती का? राहुल गांधींच्या प्रश्नाला परराष्ट्र मंत्र्यांचा खुलासा

15 जून रोजी गलवान खोऱ्यात झालेल्या चकमकीत 20 भारतीय जवान शहीद झाले आहे. यानंतर अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत

  • Share this:

नवी दिल्ली, 18 जून :  पूर्व ल़डाखमध्ये चिनी सैनिकांसमोर भारतीय जवान निशस्त्र असल्याबाबत कॉग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी प्रश्न उपस्थित केला होता. त्यावर परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

परराष्ट्र मंत्र्यांनी भारतीय जवान निशस्त्र गेल्याचा दावा फेटाळला आहे. ते म्हणाले की गलवान खोऱ्यात 15 जून रोजी भारतीय सेनाचा एकही जवान निशस्त्र नव्हता. भारतातील प्रत्येक सैनिकाकडे पुरेशी हत्यारं होती. मात्र एका करारानुसार गलवान घाटीत शस्त्रांचा वापर करू शकत नाही.

राहुल गांधी यांची पोस्ट रिट्विट करीत जयशंकर यांनी लिहिले आहे की, आपण तथ्य तपासून घ्यायला हवेत. बॉर्डरवर ड्यूटी करणाऱ्या सैनिकांकडे नेहमीत हत्यारे असतात. विशेष करुन पोस्टवरुन निघताना. त्याचं म्हणणं आहे की तणावादरम्यान शस्त्रांचा वापर न करण्याची मोठी परंपरा (1966 आणि 2005 च्या करारानुसार) राहिली आहे.

काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी ट्विट करील चिनी सैनिकांविरोधात भारतीय सैनिक निशस्त्र असल्याचा प्रश्न उपस्थित केला होता. त्यानंतर परराष्ट्र मंत्र्यांनी याबाबत खुलासा केला.

दरम्यान गलवान खोऱ्यात भारत आणि चीन सैन्यात सोमवारी झालेल्या हिंसक संघर्षामुळे तणावाचं वातवारण आहे. चीनने भारतीय सैनिकांवर केलेल्या हल्ल्यानंतर आता भारताकडून चीनला अद्दल घडवण्यासाठी तयारी सुरू आहे. याच पार्श्वभूमीवर लडाखमध्ये सीमारेषेवर हालचालींना वेळ आला आहे.

हे वाचा-चीनचा सूर बदलला; सीमेवरची परिस्थिती नियंत्रणात पण सैनिकांच्या मृत्यूबद्दल मौन

संपादन - मीनल गांगुर्डे

First published: June 18, 2020, 6:59 PM IST

ताज्या बातम्या