पाकिस्तानच्या बलुचिस्तानमध्ये भाजपचे झेंडे फडकावले गेले? काय आहे सत्य

पाकिस्तानच्या बलुचिस्तानमध्ये भाजपचे झेंडे फडकावले गेले? काय आहे सत्य

खरंच पाकिस्तानच्या बलुचिस्तान भागात भाजपचा झेंडे फडकावले गेले? मोदी सरकार सत्तेत आल्यानंतर बलुचिस्तान पाकिस्तानपासून वेगळा केला जाणार? काय आहे सत्य?

  • Share this:

नवी दिल्ली, 14 मे : पाकिस्तानच्या बलुचिस्तान भागात भारतीय जनता पक्षाचे झेंडे फडकावले गेले. घोषणा दिल्या गेल्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. खरंच बलुचिस्तानमध्ये भाजपचे झेंडे फडकावले गेले? याचा शोध नेटवर्क18नं घेतला. त्यानंतर व्हायरल होत असलेला व्हिडीओ खोटा असल्याचं सिद्ध झालं. व्हायरल व्हिडीओमध्ये लोक घोषणा देताना आणि भाजपचा झेंडा हातात घेऊन नाचताना दिसत आहेत.

कुठला आहे व्हिडीओ

2 मे 2019 रोजी व्हायरल व्हिडीओ फेसबुकवर अपलोड केला गेला. सध्या या व्हिडीओला हजारोंनी शेअर केलं आहे. 1 मिनिट 55 सेकंदाच्या या व्हिडीओमध्ये बलुचिस्तानमधील महिला आणि पुरूष नाच-गाणं करत भाजपाचा झेंडा हातात घेतलेले दिसत असल्याचं म्हटलं आहे.

पण, हा व्हिडीओ बलुचिस्तानमधील नसून जम्मू – काश्मीरमधील आहे. भाजपचे उमेदवार सोफी युसुफ विधान परिषदेकरता उमेदवारी अर्ज भरायला जात असतानाचा हा व्हिडीओ आहे. सोफी युसुफ यांनी 30 मार्च 2019 रोजी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून हा व्हिडीओ शेअर केला आहे. शिवाय, त्याखाली उमेदवारी अर्ज भरायला जाताना असं देखील म्हटलं आहे.

विलासराव देशमुखांविरोधात बोलणाऱ्या मोदींच्या या मंत्र्याला रितेशचं प्रत्युत्तर

व्हिडीओमध्ये काय आहे

व्हायर झालेल्या व्हिडीओमध्ये हिंदीमध्ये कॅप्शन देण्यात आले आहेत. त्यामध्ये भारतीय जनता पक्षाचा झेंडा बलुचिस्तानमध्ये फडकला. पुन्हा मोदी सरकर सत्तेत आल्यानंतर बलुचिस्तान स्वतंत्र होणार. मोदींच्या कार्यकाळात हे शक्य होणार असल्याचं कॅप्सन व्हिडीओमध्ये देण्यात आलं आहे. पण, हा व्हिडीओ खोटा आहे.

VIDEO: सिंधुदुर्गातील दोन गावांमध्ये 6 हत्तींचा धुमाकूळ, ग्रामस्थांमध्ये भीती

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 14, 2019 10:02 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading