नवी दिल्ली, 21 डिसेंबर : शौक बडी चीज होती है असं म्हणतात. काहींना हा छंद असतोच एखाद्या गोष्टींचं किंवा आपल्याला आवडलेल्या गोष्टींचं कलेक्शन करायचा. कुणी तिकीटाचं करतं कुणी विविध वस्तुचं कुणी साड्यांचं करतं तर कुणी नाणी-नोटा आणि चलन. पण एका चिमुकलीला चक्क दगड, शंख शिंपले नाही तर काडेपेटीचं कलेक्शन करण्याचा ध्यास लागला आणि या चिमुकलीनं जगभरातील काडेपेटी आणि त्यावरची चित्र साठवण्याची सुरुवात केली.
भुवनेश्वरचे दिव्यांशी तिसर्या वर्गात शिकतात. पण अशा वयात तिने वेगवेगळ्या देशांकडून जवळपास 5000 हून अधिक काडेपेटी जमा केल्या आहेत. दिव्यांशीला काडेपेटीचे बॉक्स जमवण्याचा छंद आहे. तीन वर्षांपासून ती या काडेपेट्यांचे बॉक्स जमा करत आहे. आतापर्यंत तिच्याकडे 5000 हून अधिक काडेपेट्यांचे वेगवेगळे बॉक्स जमा झाले आहेत.
Bhubaneswar: Dibyanshi, a class three student has collected over 5,000 matchboxes from different countries.
She says,"My father is wildlife photographer & travels a lot. I also ask my relatives to bring matchboxes for me. I've organized them according to various themes." (18.12) pic.twitter.com/0Pxn0B9UjR
दिव्यांशीकडे नेपाळ, पोलंड, भूतान, जपान, बांगलादेश यासह जगातील अनेक देशांमध्ये वापरल्या जाणाऱ्या काडेपेटीच्या बॉक्सचा संग्रह आहे. पण मजेची गोष्ट म्हणजे ती स्वत: कधीच परदेशात गेली नाही. खरं तर, जेव्हा जेव्हा कोणी नातेवाईक परदेशातून येतो तेव्हा दिव्यांशी त्यांना काडेपेटी बॉक्स आणण्यास सांगते.
या मुलीचे वडील फोटोग्राफर आहेत. वाइल्डलाइफ फोटोग्राफिसाठी त्यांना खूप फिरावं लागतं. त्यामुळे ते अनेक देशांमध्ये जाऊन आले आहेत. त्यांच्याकडून किंवा इतर नातेवाईकांकडून देखील दिव्यांशीला या काडेपेटीचे बॉक्स मिळतात किंवा ती आणण्याचा आग्रह करते.