दिवाळीनिमित्त डायमंड किंगने कामगारांना घर, दागिने आणि गाड्या दिल्या गिफ्ट

क असा अवलिया आहे, जो आपल्या कामगारांवर भेटवस्तूंचा अक्षरश: पाऊस पाडतो.

News18 Lokmat | Updated On: Oct 26, 2018 08:31 AM IST

दिवाळीनिमित्त डायमंड किंगने कामगारांना घर, दागिने आणि गाड्या दिल्या गिफ्ट

 

सूरत, 26 ऑक्टोबर : दिवाळी या सणाला भारतात मोठं महत्त्व आहे. दिवाळीनिमित्त प्रत्येकाला काही ना काही खरेदी करायची असते. म्हणूनच दिवाळी आली की कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या कामगारांना वेध लागतात ते बोनस किंवा भेटवस्तूंचे. अशावेळी अनेक कंपन्या आपल्या कामगारांना बोनस किंवा छोट्यामोठ्या भेटवस्तू देतात. पण गुजरातच्या सूरतमध्ये एक असा अवलिया आहे जो आपल्या कामगारांवर भेटवस्तूंचा अक्षरश: पाऊस पाडतो.

डायमंड किंग अशी ओळख असणारे सावजी भाई ढोलकिया हे दरवर्षीच आपल्या कामगारांना दिवाळीनिमित्त काहीतरी विशेष भेटवस्तू देत असतात. यावर्षीही सावजी यांनी कामगारांना दिलेल्या भेटवस्तूंनी सगळ्यांचेच लक्ष वेधून घेतलं आहे.

सावजी ढोलकिया यांनी दिवाळीनिमित्त आपल्या कामगारांना चक्क गाडी, घर आणि दागिने अशा महागड्या भेटवस्तू दिल्या आहेत. सावजी ढोलकियांनी आपल्या कंपनीतील 600 कर्मचाऱ्यांना गाड्या भेट दिल्या. तसंच काही कर्मचाऱ्यांना दागिने आणि घरंही भेट म्हणून दिली.

दरम्यान, सावजी भाई ढोलकिया यांच्या या कार्यक्रमाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिडिओ कॉन्फरंसिंगच्या माध्यमातून हजेरी लावली. तसंच नरेंद्र मोदींनी कंपनीच्या कर्मचाऱ्यांना संबोधितही केलं.  ‘मुद्रा योजनेच्या माध्यमातून देशात सध्या रोजगाराच्या मोठ्या संधी आहेत,’ असं यावेळी नरेंद्र मोदी म्हणाले.

Loading...

VIDEO : भयानक! लाईव्ह मर्डरचा व्हिडिओ व्हायरल; भर रस्त्यात महिलेला गोळ्या घातल्या

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 26, 2018 08:29 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...