अहमदाबाद 25 मार्च : गुजरातमध्ये कोरोनामुळे एका महिलेचा आज मृत्यू झाला. ही महिला 85 वर्षांची होती. सोदी अरेबियावरून काही काही दिवसांपूर्वीच ती परतली होती. तिच्यावर उपचार सुरू होते. त्यातच तिचा मृत्यू झाला. त्यामुळे कोरोनामुळे राज्यातल्या मृत्यूची संख्या आता 2 झाली आहे. तर देशातही झापाट्याने संख्या वाढत असून आत्तापर्यंत 606 जणांना देशभरात लागण झाली असून 10 जणांचा मृत्यू झालाय. तर 44 जण बरे झाले आहेत.
भारतातील (India) कोरोनाग्रस्त (Coronavirus) रुग्णांचा आकडा वाढला आहे. एकूण 606 रुग्ण कोरोनाव्हायरसच्या विळख्यात आहे. त्यापैकी 10 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. महाराष्ट्रात (Maharashtra) सर्वाधिक 122 रुग्ण आहेत. म्हणजे प्रत्येकी पाचवा रुग्ण हा राज्यातील आहे.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने देशातील कोरोनाव्हायरसची एकूण आकडेवारी जारी केली आहे. एकूण 606 प्रकरणांपैकी 553 प्रकरणं अॅक्टिव्ह आहेत, तर 42 रुग्ण बरे झालेत, त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर 10 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
‘लॉकडाउन’मुळे प्रेमाला आला बहर, कंडोम्सच्या विक्रीत विक्रमी वाढ
देशात सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात आहेत. राज्यात दिवसभरात कोरोनाचे नवे 15 रुग्ण आढळलेत. यामध्ये मुंबईत 9, ठाण्यातील एका रुग्णाचा समावेश आहे. तर सांगलीत एकाच कुटुंबातील 5 जणांना व्हायरसची लागण झाली आहे.
Gujarat: The 85-year-old woman who passed away in Ahmedabad today and was tested positive for #COVID19, had travel history to Saudi Arabia. https://t.co/fOUrxM5riY
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.