परराष्ट्रमंत्री जयशंकर यांचा मुलगा म्हणतो, 'पासपोर्ट बनवण्यासाठी माझ्याकडे येऊ नका!'

एस. जयशंकर परराष्ट्र मंत्री झाल्यानंतर लगेचच त्यांचा मुलगा ध्रुव जयशंकर याने ट्वीट केलं आहे. 'कुणीतरी मला याबद्दल विचारण्याआधीच सांगतो की मी पासपोर्ट किंवा व्हिसा मिळवून देण्यासाठी मदत करणार नाही. कुणी परदेशात तुरुंगात असेल तर त्याबद्दलही मी काही करू शकणार नाही,' असं त्याने ट्वीटमध्ये म्हटलं आहे.

Arti Kulkarni | News18 Lokmat | Updated On: May 31, 2019 04:06 PM IST

परराष्ट्रमंत्री जयशंकर यांचा मुलगा म्हणतो, 'पासपोर्ट बनवण्यासाठी माझ्याकडे येऊ नका!'

नवी दिल्ली, 31 मे : मोदी सरकारमध्ये माजी परराष्ट्र सचिव एस. जयशंकर यांच्याकडे परराष्ट्र मंत्रालयाची जबाबदारी देण्यात आली आहे. जयशंकर परराष्ट्र मंत्री झाल्यानंतर लगेचच त्यांचा मुलगा ध्रुव जयशंकर याने ट्वीट केलं आहे.

'कुणीतरी मला याबद्दल विचारण्याआधीच सांगतो की मी पासपोर्ट किंवा व्हिसा मिळवून देण्यासाठी मदत करणार नाही. कुणी परदेशात तुरुंगात असेल तर त्याबद्दलही मी काही करू शकणार नाही,' असं त्याने ट्वीटमध्ये म्हटलं आहे.

ध्रुव जयशंकर याचं हे ट्वीट सध्या सोशल मीडियावर खूपच गाजतं आहे.



Loading...

गाढा अनुभव

एस. जयशंकर जेव्हा परराष्ट्र सचिव होते तेव्हा त्यांनी अमेरिका आणि चीनसारख्या महासत्तांशी राजनैतिक संबंधांवर पकड मिळवली होती. चीन आणि भारत यांच्या परस्पर संबंधांमध्ये गेल्या काही काळात अनेक चढउतार पाहायला मिळाले. त्यावेळी डोकलाम प्रश्नासारखा अवघड तिढाही जयशंकर यांनी मुत्सद्दीपणे सोडवला. भारताच्या परराष्ट्र धोरणाची दिशा ठरवण्यात त्यांनी अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावली आहे.

एस. जयशंकर हे 64 वर्षांचे आहेत. पराराष्ट्र खात्यातला त्यांचा गाढा अनुभव सरकारसाठी उपयोगी ठरेल. त्यांच्याकडे मंत्रिपदाची धुरा सोपवणं हे त्यांच्या कार्यक्षमतेला दिलेलं प्रशस्तिपत्रच आहे.

प्रभावी परराष्ट्र धोरण

अमेरिका आणि चीनसारख्या महासत्तांची ज्याला उत्तम जाण आहे अशी व्यक्ती मंत्रिमंडळात आल्यामुळे मोदी सरकारचं परराष्ट्र धोरण आणखी प्रभावी ठरणार आहे. नरेद्र मोदींच्या कारकिर्दीत भारत आणि जपानच्या संबंधांमध्ये नवं पर्व सुरू झालं. मोदी आणि जपानचे पंतप्रधान शिंजो आबे यांच्यामध्ये मैत्रीचं नातं विकसित होण्यातही जयशंकर यांचं योगदान मोठं आहे.

नरेंद्र मोदींवर प्रभाव

2015 ते 2018 या काळात एस. जयशंकर परराष्ट्र सचिव होते. त्यावेळी जयशंकर यांची बुद्धिमत्ता, अनुभव, त्यांची कार्यशैली यामुळे पंतप्रधान नरेद्र मोदी प्रभावित झाले. 2018 मध्ये ते निवृत्त झाले त्यावेळीही भारत सरकार वेळोवेळी त्यांचा सल्ला घेत असे.

निवृत्त झाल्यानंतर एस. जयशंकर हे टाटा अँड सन्समध्ये महत्त्वाची जबाबदारी सांभाळत होते.आता त्यांना केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान मिळालं आहे.

===================================================================================

VIDEO : खातेवाटपावर शिवसेना नाराज, या आणि इतर महत्त्वाच्या टॉप18 बातम्या

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: May 31, 2019 04:06 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...