VIDEO : गुर्जर आरक्षण आंदोलन पेटले, पोलिसांचा गोळीबार!

VIDEO : गुर्जर आरक्षण आंदोलन पेटले, पोलिसांचा गोळीबार!

आंदोलनामुळे 13 फेब्रुवारीपर्यंत 26 ट्रेन्स रद्द करण्यात आल्या आहेत. तर तेवढ्याच गाड्यांचे मार्ग वळविण्यात आले आहेत.

  • Share this:

नवी दिल्ली 10 फेब्रुवारी : राजस्थानमध्ये सुरू असलेल्या गुर्जर आरक्षणाने आता उग्र रुप धारण केलंय. रविवारी आंदोलनकारी आणि पोलिसांमध्ये जोरधार चकमक उडाल्याने तणाव निर्माण झाला आहे. आंदोलकांनी धौलपूर इथून जाणारा दिल्ली - मुंबई हायवे 3 रोखून धरला. त्यामुळे वाहतूक कोंडी झाली. संतप्त आंदोलकांना पांगविण्यासाठी पोलिसांनी हवेत गोळीबारही केला. गुर्जर समाजाला आरक्षण द्यावं अशी त्यांची मागणी आहे.

संतप्त जमावाने पोलिसांवर दगडफेक सुरू केल्याने पोलिसांनी गोळीबार केला. त्याच्यामुळे प्रचंड तणाव निर्माण झाला. तणाव असाल तरी परिस्थिती नियंत्रणात असल्याचं प्रशासनाने सांगितलं आहे. नोकरी आणि शिक्षणसंस्थांमध्ये 5 टक्के आरक्षण द्यावं अशी मागणी होत आहे.  आंदोलनामुळे 13 फेब्रुवारीपर्यंत 26 ट्रेन्स रद्द करण्यात आल्या आहेत. तर तेवढ्याच गाड्यांचे मार्ग वळविण्यात आले आहेत.

राज्यातील लोकसभेच्या 25 पैकी 15 जागांवर गुर्जरांची मतांचा प्रभाव आहे. त्यापैकी 8 मतदारसंघात गुर्जर मतांची संख्या इतकी आहे की ते निकाल फिरवू शकतात. कायद्याच्या चौकटीत अडकलेल्या गुर्जर आरक्षणाचा मुद्दा निकाली काढणे हे राज्यातील काँग्रेस सरकार समोरचे सर्वात मोठे आव्हान ठरणार आहे. जर असे झाले नाही तर त्याचा फटका लोकसभा निवडणुकीत बसण्याची शक्यता आहे.

कोणत्या मतदारसंघात किती ताकद आहे गुर्जरांची

टोंक-सवाईमाधोपूर लोकसभा मतदारसंघात गुर्जर मतांची संख्या 2 लाख 45 हजार इतकी आहे. विशेष म्हणजे याच भागात गुर्जर समाज एकजूट होत आहे. याशिवाय भीलवाड येथे 2 लाख 20 हजार मतदार आहेत. भरतपूर लोकसभा मतदारसंघात 2 लाख गुर्जर मतदार आहेत. करौली-धौलपूर मतदारसंघात 1 लाख 70 हजार, दौसामध्ये 1 लाख 50, चित्तौडगडमध्ये 1 लाख 43 हजार, अजमेरमध्ये 1 लाख 42 हजार तर कोटामध्ये 1 लाख 36 हजार गुर्जर मते आहेत. याशिवाय अलवर, बूंदी, राजसमंद आणि जयपूर जिल्ह्यात गुर्जर मतांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे.

VIDEO : भाजप खासदाराची जीभ घसरली; प्रियांका गांधींबाबत केलं 'हे' वक्तव्य

First published: February 10, 2019, 5:01 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading