हिमाचल प्रदेशमध्ये शाळेची बस दीडशे फूट दरीत कोसळली, 30 जणांचा मृत्यू

हिमाचल प्रदेशमध्ये शाळेची बस दीडशे फूट दरीत कोसळली, 30 जणांचा मृत्यू

या दुर्घटनेत 27 शाळकरी विद्यार्थ्यांसह 30 जणांचा दुर्दैवी मृत्यू झालाय. मृतांमध्ये दोन शिक्षक आणि ड्रायव्हरचा समावेश आहे.

  • Share this:

हिमाचल प्रदेश, 09 एप्रिल : हिमाचल प्रदेशमध्ये एका शाळेची बस दीडशे फूट खोल दरीत कोसळली. या दुर्घटनेत 27 शाळकरी विद्यार्थ्यांसह 30 जणांचा दुर्दैवी मृत्यू झालाय. मृतांमध्ये दोन शिक्षक आणि ड्रायव्हरचा समावेश आहे.

मिळालेल्या माहितीनुसार ही दुर्घटना कांगडा जिल्ह्यात घडली. बलजीत राम पठानिया या खासगी शाळेची बस सहलीवरून परतल्यानंतर मुलांना घरी सोडण्यासाठी निघाली होती. नुरपूर आणि मलकवालजवळ ही बस पलटी झाली आणि दीडशे फूट खोल दरीत कोसळली. यात 27 मुलांचा मृत्यू झालाय. या बसमध्ये 35 शाळकरी मुलं होती. हे सर्व विद्यार्थी नर्सरी आणि पाचव्या इयत्तेत शिकत होती. या सर्वांचं वय 10 वर्षांहुन खाली होते. या अपघातात दोन शिक्षक आणि ड्रायव्हरचा मृत्यू झालाय. जखमी विद्यार्थ्यांना शासकीय आणि खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. घटनास्थळी एनडीआरएफची टीम रवाना दाखल झाली आहे. बचावकार्य सुरू आहे.

First published: April 9, 2018, 7:30 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading