मध्यप्रदेश : उपोषणाला बसलेल्या मेधा पाटकर यांची प्रकृती खालावली

मध्यप्रदेश : उपोषणाला बसलेल्या मेधा पाटकर यांची प्रकृती खालावली

सरदार सरोवर धरणाची उंची कमी करण्यात यावी यासाठी गेल्या 9 दिवसांपासून मेधा पाटकर आणि काही धरणग्रस्त उपोषणावर बसले आहे.

  • Share this:

04 आॅगस्ट : मध्यप्रदेशमध्ये उपोषणावर बसलेल्या सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांची प्रकृती आठव्या दिवशी खालावली आहे. मात्र, जोपर्यंत धरणग्रस्तांच्या मागण्या मान्य होणार नाही तोपर्यंत उपोषण सुरूच राहणार असा निर्धार पाटकर यांनी केलाय.

सरदार सरोवर धरणाची उंची कमी करण्यात यावी यासाठी गेल्या 9 दिवसांपासून मेधा पाटकर आणि काही धरणग्रस्त उपोषणावर बसले आहे. आधी डाॅक्टरांची टीम उपोषणस्थळी पोहचली मात्र धरणग्रस्तांनी विरोध केल्यामुळे त्यांना माघारी परतावं लागलं.

अखेर धरणग्रस्तांनी डाॅक्टरांना तपासणी करण्याची अनुमती दिली. पण जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होणार नाही तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही असा निर्धार मेधा पाटकर यांनी केलाय.

एसडीएम रिषभ गुप्ता यांनी धरणग्रस्त आंदोलकांशी बातचीत केली. पण आंदोलक आपल्या मागण्यांवर ठाम आहे. त्यामुळे गुप्ता यांची टीम माघारी परतली. आंदोलनाला 9 दिवस उलटले तरीही  मध्यप्रदेश सरकारकडून आंदोलकांशी बोलण्यासाठी कुणीही पुढे आले नाही.

First published: August 4, 2017, 10:31 PM IST

ताज्या बातम्या