S M L

...आता पाकिस्तान म्हणतंय शस्त्रसंधीवर बोलू !

या चर्चेत दोन्ही देशांनी 2003 मध्ये झालेल्या शांती करारवर सहमती दर्शवली आहे. दोन्ही देश शस्त्रसंधीचं उल्लंघन न करण्यास सहमती दर्शवली आहे.

Sachin Salve | Updated On: May 29, 2018 09:51 PM IST

...आता पाकिस्तान म्हणतंय शस्त्रसंधीवर बोलू !

नवी दिल्ली, 29 मे : भारत आणि पाकिस्तानच्या डायरेक्टर जनरल आॅफ मिलिट्री आॅपरेशन (DGMO) मध्ये मंगळवारी सीमेवर शांतता राखण्यासाठी हाॅटलाईनवर चर्चा झाली. या चर्चेत दोन्ही देशांनी 2003 मध्ये झालेल्या शांती करारवर सहमती दर्शवली आहे. दोन्ही देश शस्त्रसंधीचं उल्लंघन न करण्यास सहमती दर्शवली आहे.

यापुढे जर कोणत्याही देशाकडून शस्त्रसंधीचं उल्लंघन झालं तर पहिले हाॅटलाईनवर चर्चा केली जाईल त्यानंतर पुढचा निर्णय घेतला जाईल असं ठरलंय.

दोन्ही देशातील सैन्य अधिकाऱ्यांमध्ये संध्याकाळी सहा वाजता हाॅटलाईनवर चर्चा झाली. या चर्चेत जम्मू-काश्मीरमध्ये सीमारेषा आणि आंतरराष्ट्रीय सीमेवर सध्याच्या परिस्थितीवर चर्चा झाली. विशेष म्हणजे पाकिस्तानच्या डीजीएमओने हाॅटलाईनवरून पहिला संपर्क साधला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: May 29, 2018 09:51 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close