अमित शहांचा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाबाबत खुलासा, 'या' नेत्याच्या हाती राज्याची धुरा

अमित शहांचा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाबाबत खुलासा, 'या' नेत्याच्या हाती राज्याची धुरा

'राज्यातली जनता ही पुन्हा एकदा महायुतीलाच साथ देणार आहे. महाराष्ट्रात आम्हीला ऐतिहासिक बहुमत मिळेल.'

  • Share this:

नवी दिल्ली 14 ऑक्टोंबर : विधानसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण होणार याची सगळ्यांना उत्सुकता आहे. शिवसेनाही यावर आपला दावा करत असते. मुख्यमंत्री कोण होईल हे अजुन ठरलेलं नाही असं भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनीही यांनीही म्हटलं होतं. याबाबतचा निर्णय अमित शहा घेतील असंही त्यांनी सांगितलं होतं. आता खुद्द अमित शहा यांनीच यावर मोठा खुलासा केलाय. ते म्हणाले, देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढविण्यात येत आहे आणि तेच राज्यांची धुरा वाहतील असंही त्यांनी आज एका मुलाखतीत स्पष्ट केलंय.

नारायण राणे यांनी जाहीर केली 'शिवसेने'वर आतापर्यंतची सर्वात मोठी भूमिका

अमित शहा म्हणाले, महाराष्ट्रात महायुती देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढवतेय. राज्यातली जनता ही पुन्हा एकदा महायुतीलाच साथ देणार आहे. आणि राज्याची धुराही देवेंद्र फडणवीसांच्याच हाती राहिल असंही त्यांनी स्पष्ट केलं. मतदानाला आता काही दिवस राहिले असताना अमित शहांच्या या वक्तव्यामुळे इतर सर्व चर्चांना विराम मिळण्याची शक्यता व्यक्त केली जातेय.

मी सोन्याची कोंबडी, मला कापू नका; काँग्रेस उमेदवाराचं मतदारांना प्रलोभन

एक व्यक्ती, एक पद या तत्वानुसार डिसेंबरपर्यंत पक्षाला नवा अध्यक्ष मिळणार आहे असंही त्यांनी स्पष्ट केलं. शहा म्हणाले, पक्षांतर्गत निवडणुका डिसेंबरपर्यंत पूर्ण होतील आणि भाजपला नवा अध्यक्ष मिळेल. पडद्याच्या मागे राहून कुणीही पक्ष चालवत नाही असंही त्यांनी स्पष्ट केलं.

'चंपा'वरून युद्ध पेटलं

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या टीकेवरून भाजपने राज ठाकरे आणि अजित पवारांवर पलटवार केलाय. राज ठाकरे आणि अजित पवार यांनी चंद्रकांत पाटलांना 'चंपा' असं म्हणत टीका केली होती. या टीकेवरून भाजपचे नेते आशीष शेलार यांनी राज ठाकरे आणि अजित पवारांवर जोरदार टीका केलीय. तुमचा सुंभ जळाला तरी पिळ जात नाही अजुनही तुम्ही चंपा बोलण्याचत धन्यता मानता का? असा सवाल त्यांनी या दोनही नेत्यांना केलाय. त्यामुळे प्रचाराच्या राहिलेल्या शेवटच्या दिवसांमध्ये 'चंपा'वरून युद्ध पेटण्याची शक्यता आहे.

मुलासाठी वाट्टेल ते, आईजवळून सहा दिवसाचं मूल चोरलं आणि मुलीला आणून ठेवलं

राज ठाकरे यांनी पुण्यातल्या सभेत चंद्रकांत पाटील यांच्यावर जोरदार टीका केली होती. तर अजित पवारही त्यांच्यावर 'चंपा'असं संबोधत टीका करत असतात. या दोनही नेत्यांना आशीष शेलार यांनी ट्विटरवरून शालजोडीतले हाणले आहेत. ते म्हणाले, सुंभ जळलं तरी पिळ नाही जळत, चंपा बोलण्यात धन्यता मानता?

धरणाचे पाणी तुमची पाठ नाही सोडत! अजुनही दर्प येतोय बारामतीला सत्तेच्या मस्तीचा. आमचा दादा कोल्हापूरकर,पण संयमी संघ शिस्तीचा. भाजपचा दादा तुमच्या गडातच तुम्हाला घोळवेल. साधा स्वयंसेवक एक दिवस बारामतीतच तुम्हाला लोळवेल.

Published by: Ajay Kautikwar
First published: October 14, 2019, 10:16 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading