• Home
 • »
 • News
 • »
 • national
 • »
 • BREAKING : अमित शहांसोबत फडणवीसांची बैठक संपली, साखर कारखान्यांवरील कारवाई थांबणार?

BREAKING : अमित शहांसोबत फडणवीसांची बैठक संपली, साखर कारखान्यांवरील कारवाई थांबणार?

'सहकारी कारखान्यांना एफआरपी पेक्षा जास्त दर दिल्याने नफा पकडून आयकर खात्याच्या ज्या नोटिसा आल्या आहेत. त्याबाबत ही मोठा दिलासा मिळणार आहे'

'सहकारी कारखान्यांना एफआरपी पेक्षा जास्त दर दिल्याने नफा पकडून आयकर खात्याच्या ज्या नोटिसा आल्या आहेत. त्याबाबत ही मोठा दिलासा मिळणार आहे'

'सहकारी कारखान्यांना एफआरपी पेक्षा जास्त दर दिल्याने नफा पकडून आयकर खात्याच्या ज्या नोटिसा आल्या आहेत. त्याबाबत ही मोठा दिलासा मिळणार आहे'

 • Share this:
  नवी दिल्ली, 19 ऑक्टोबर : राज्यात एकीकडे महाविकास आघाडी सरकारमधील (mva government) मंत्र्यांच्या संबंधीत साखर कारखान्यावर ईडीकडून कारवाई होत आहे. तर दुसरीकडे, साखर कारखान्यांच्याबाबतीत भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (devendra fadanvis) यांनी सहकार मंत्री अमित शहा (amit shah) यांची भेट घेतली. यावेळी, आयकरच्या नोटिसांवर तोडगा काढणार असून कोणत्याही कारखान्यावर कारवाई होणार नाही. सहकारी कारखान्यांना उभारी देण्याचा प्रयत्न' असं वक्तव्य फडणवीस यांनी केलं. नवी दिल्लीतील  नाँर्थ ब्लॉकमध्ये केंद्रीय सहकार मंत्री अमित शहांच्या उपस्थितीत सहकारावर महत्वाची बैठक पार पडली. या बैठकीला  देवेंद्र फडणवीस, रावसाहेब दानवे यांच्यासह विखे, हर्षवर्धन पाटील, धनंजय महाडिक, राहुल कुल, रणजितसिंह मोहिते-पाटील उपस्थितीत होते. या बैठकीनंतर फडणवीस यांनी माध्यमांशी संवाद साधला. 'सहकारी कारखान्यांना एफआरपी पेक्षा जास्त दर दिल्याने नफा पकडून आयकर खात्याच्या ज्या नोटिसा आल्या आहेत. त्याबाबत ही मोठा दिलासा मिळणार आहे. साखर कारखान्यांना मदतीमध्ये राज्य सरकारकडून भेदभाव केला जातोय, असं फडणवीस म्हणाले. भाजप-मनसे युतीला रामदास आठवलेंचा विरोध, म्हणाले... तसंच,  साखर कारखान्यांना तातडीने पुनर्गठित करण्याची गरज आहे. त्याबाबतही चर्चा झाली. या करवसुलीसाठी कुठलीही कारवाई होणार नाही.  सत्ताधारी कारखान्यांना आऊट ऑफ व बॉक्स जाऊन मदत केली जात आहे. एकरकमी एफआरपीचा कायदा शरद पवार कृषीमंत्री असताना आणि राज्यात २००४ मध्ये आघाडी सरकार असतानाच केला. त्यामुळे केंद्र सरकारला याबाबत आणण्याचा कुठला प्रयत्न करू नये, असंही फडणवीस म्हणाले. Warm Up Match नंतर Wasim Jaffer ने मायकल वॉनची उडवली खिल्ली; म्हणाला... दरम्यान, 'केंद्रीय गृह सहकार मंत्री अमित शहा यांच्यासोबत देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात आलेल्या शिष्टमंडळाची बैठक झाली. या बैठकीमध्ये साखर कारखान्यांना आयकर खात्याच्या वतीने बजावण्यात आलेल्या नोटीस संदर्भात विस्ताराने चर्चा झाली. यामध्ये आयकर नोटिस संदर्भात केंद्र सरकार सकारात्मक विचार करेल असे आश्वासन दिल्याचे  माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी  सांगितले.
  Published by:sachin Salve
  First published: