मराठी बातम्या /बातम्या /देश /

अमित शहांसोबतच्या बैठकीत नेमकं काय घडलं? देवेंद्र फडणवीस यांची पहिली प्रतिक्रिया

अमित शहांसोबतच्या बैठकीत नेमकं काय घडलं? देवेंद्र फडणवीस यांची पहिली प्रतिक्रिया

देवेंद्र फडणवीस आणि अमित शहा यांच्यात जवळपास 25 मिनिटे वेगळी चर्चा झाली असून यावेळी राज्यातील राजकीय घडामोडींवरही खलबतं करण्यात आल्याची माहिती आहे.

मुंबई, 17 जुलै : विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांची भेट घेतली. राजस्थानमध्ये घडलेल्या राजकीय घडामोडी आणि महाराष्ट्राबाबतची चर्चा या पार्श्वभूमीवर ही भेट महत्त्वपूर्ण समजली जात होती. मात्र या भेटीत राजकीय चर्चा झाली नसल्याचं फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी स्पष्ट केलं आहे. 'कोरोना संदर्भात केंद्रीय गृहमंत्र्यांना माहिती दिली. देशाचे गृहमंत्री कोरोना संदर्भात लक्ष देत आहे. केंद्रात आमचे सरकार आहे, त्यामुळे आम्ही दिल्लीत आलो. ही कुठलीही राजकीय भेट नाही. आम्हाला सरकार पाडण्यात इंटरेस्ट नाही. स्वतःला मारून रडणारे हे सरकार आहे,' अशी प्रतिक्रिया अमित शहा यांच्यासोबतच्या बैठकीनंतर देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. राजकीय चर्चा झाली? दिल्ली भेटीत राजकीय चर्चा झाली नसल्याचा दावा देवेंद्र फडणवीस करत असले तरीही या भेटीत कोरोना स्थितीसह राज्यातील राजकारणाबाबतही चर्चा झाली असल्याची माहिती आहे. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अमित शहा यांच्यात जवळपास 25 मिनिटे वेगळी चर्चा झाली असून यावेळी राज्यातील राजकीय घडामोडींवरही खलबतं करण्यात आल्याची माहिती आहे. कोणत्या मुद्द्यांवर झाली बैठक, फडणवीस म्हणतात... - साखर कारखान्याची पुनर्रचना करण्यात यावी. - बेल आऊट पॅकेज देण्यात यावे. - इथेनॉल संदर्भात इंधन कंपनीने दीर्घ मुदतीचे करार करावा - वित्तीय संस्थांनी कारखान्यांना मदत करावी - निर्यात करण्याची सबसिडी देण्यात यावी दरम्यान, फडणवीस यांची भाजपच्या केंद्रीय संसदीय समितीत निवड होणार आहे, अशी जोरदार चर्चा सध्या सुरू आहे. व्यंकय्या नायडू हे उपराष्ट्रपती झाल्याने, तसंच सुषमा स्वराज, अरुण जेटली आणि अनंतकुमार यांचं निधन झाल्यामुळे पक्षाच्या संसदीय समितीत चार जागा रिक्त झाल्या आहेत. त्यात एका जागी फडणवीस यांची वर्णी लागेल अशी चर्चा आहे. या सगळ्या विषयांच्या पार्श्वभूमीवर फडणवीस यांच्या दौऱ्याकडे सगळ्यांचं विशेष लक्ष आहे.
First published:

पुढील बातम्या