मराठी बातम्या /बातम्या /देश /

VIDEO : लॉकडाऊन असतानाही सरकारी शाळेत घुसला सिंह, डरकाळीने हादरलं अख्ख गाव!

VIDEO : लॉकडाऊन असतानाही सरकारी शाळेत घुसला सिंह, डरकाळीने हादरलं अख्ख गाव!

वन विभागाने पिंजरा लावून सिंहा पकडण्याचा प्रयत्न केला. मात्र सिंह काही बाहेर यायला तयारच नव्हता. काही तासांच्या प्रयत्नानंतर सिंह जाळ्यात अडकला.

  • Published by:  Priyanka Gawde

उना(गुजरात) 02 मे : सर्व देशात सध्या लॉकडाऊन आहे. सगळी माणसं घरात बंद आहेत. गुजरातमधल्या उनामध्ये लॉकडाऊन असतानाच एका सरकारी शाळेत सिंह घुसला. त्याच्या डरकाळीने अख्ख गाव हादरून गेलं. वनविभागाने अथक प्रयत्न करून या सिंहाला पिंजऱ्यात पकडलं आणि पुन्हा जंगलात नेऊन सोडलं. निर्मनुष्य रस्ते, थांबलेली रहदारी त्यामुळे जंगलातून हा सिंह गावात आल्याचं वनविभागाने सांगितलं. शाळेला सुट्टी असल्याने मोठं संकट टळलं.

सौराष्ट्रातल्या गीर सोमनाथ जिल्ह्यामधलं उना हे एक छोटसं गाव आहे. शनिवारी दुपारी लोकांना शाळेतून डरकाळ्यांचा आवाज ऐकू आला. सिंहाच्या डरकाळ्यांनी सगळं गावच जागं झालं. जवळच्या लोकांनी लगेच शाळेची दारं बाहेरून लगेच बंद करून घेतली आणि वनविभागाला माहिती दिली.

वन विभागाने पिंजरा लावून सिंहा पकडण्याचा प्रयत्न केला. मात्र सिंह काही बाहेर यायला तयारच नव्हता. काही तासांच्या प्रयत्नानंतर सिंह वनविभागाच्या जाळ्यात अडकला आणि वनाधिकाऱ्यांनी आणि गावकऱ्यांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. उना हे गाव सिंहासाठी प्रसिद्ध असलेल्या गीर अभयारण्याजवळ आहे. त्यामुळे त्याच जंगलातून हा सिंह आला अशी माहिती वनाधिकाऱ्यांनी दिली. या सिंहाला पुन्हा जंगलात सोडण्यात आलं आहे.

काही दिवस गावकऱ्यांनी काळजी घ्यावी असं आवाहनही वनाधिकाऱ्यांनी केलं आहे. उन्ह तापत असल्याने पाण्याच्या शोधासाठीही प्राणी जंगलाच्या बाहेर येण्याचा प्रयत्न करतात असंही अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे.

First published: