तब्येत बिघडली तरी शेवटच्या श्वासापर्यंत कोरोनाच्या लढ्यात होता सहभाग, शेवटी ड्युटीवरच जवानाने सोडले प्राण

तब्येत बिघडली तरी शेवटच्या श्वासापर्यंत कोरोनाच्या लढ्यात होता सहभाग, शेवटी ड्युटीवरच जवानाने सोडले प्राण

शेवटच्या श्वासापर्यंत तो कोरोनाच्या लढ्यात सहभागी होऊन लढाई करीत होता. स्वत:कडे दुर्लक्ष करीत त्याने सेवेला प्राधान्य दिलं

  • Share this:

इंदूर, 6 एप्रिल : परदेशीपुरा ठाण्यातील एका पोलीस कर्मचारी अबरार खान याचा ड्युटीदरम्यान मृत्यू झाल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. या पोलीस कर्मचाऱ्याची तब्येत गेल्या अनेक दिवसांपासून ढासळत होती. त्यांना काही दिवसांसाठी घरी पाठविण्यात आले होते. मात्र कोरोनामुळे (Coronavirus) बिघडत चाललेल्या परिस्थितीत इंदूरमधील वाढत्या कामासाठी ते ड्यूटीवर येत होते. त्यादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

अबरार खान यांना अस्थमा व रक्तदाबाचा त्रास होता. त्यांच्या मृत्यूबाबत माहिती मिळताच आयजी विवेक शर्मा तातडीने परदेशीपुरा ठाण्यात पोहोचले आणि स्टाफची वैद्यकीय तपासणी करण्याचे निर्देश दिले.

संबंधित - कोरोना काळातला भयावह VIDEO, भुकेपोटी कोंबड्याच कोंबड्यांना खात आहे मारून!

खान यांना कोरोनाची (Covid -19) लागण झाली होती का? याचा तपास केला जात आहे.

हा पोलीस जवान प्रामाणिकपणे शेवटच्या श्वासापर्यंत ड्यूटीवर तैनात होता. मात्र तब्येचीच्या पुढे काहीच चालत नाही. आणि कामावर त्याने आपले प्राण सोडले.

इंदूर येथील परदेशीपुरा ठाण्यातील पदस्थ आरक्षक अबरार खान यांचा आज ड्युटीदरम्यान मृत्यू झाला. तब्येत जास्तच बिघडल्यामुळे त्यांना जवळील रुग्णालयात नेण्यात आले. मात्र तेथेच त्यांचा मृत्यू झाला. दोन दिवसांपूर्वी खान यांची तब्येत बिघडली होती. एक दिवस आराम केल्यानंतर ते पुन्हा ड्यूटीवर आले. रात्री उशिरा पुन्हा त्यांची तब्येत बिघडली. मात्र कामाबाबत अत्यंत प्रामाणिक असलेले खान औषध घेऊन आज सकाळी पुन्हा ड्युटीवर हजर झाले आणि मालवा मिल येथे ड्यूटीवर तैनात झाले. मात्र पुन्हा तब्येत बिघडल्यानंतर त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र तिसऱ्यांना रुग्णालयात दाखल केल्यानंतर त्यांना मृत्यू झाला.

First published: April 6, 2020, 4:54 PM IST

ताज्या बातम्या