मराठी बातम्या /बातम्या /देश /

हिंदू धर्म सोडून मुस्लीम होण्याची इच्छा; 1 वर्षापासून प्रतीक्षेत, आता मोठी लढाई लढण्याच्या तयारीत!

हिंदू धर्म सोडून मुस्लीम होण्याची इच्छा; 1 वर्षापासून प्रतीक्षेत, आता मोठी लढाई लढण्याच्या तयारीत!

तो गेल्या 6 वर्षांपासून मुस्लीम व्यक्ती प्रमाणे राहत आहे. त्यांनी सांगितलं की ते नियमित रमजानमध्ये रोजा ठेवतात, नमाज पठण करतात

तो गेल्या 6 वर्षांपासून मुस्लीम व्यक्ती प्रमाणे राहत आहे. त्यांनी सांगितलं की ते नियमित रमजानमध्ये रोजा ठेवतात, नमाज पठण करतात

तो गेल्या 6 वर्षांपासून मुस्लीम व्यक्ती प्रमाणे राहत आहे. त्यांनी सांगितलं की ते नियमित रमजानमध्ये रोजा ठेवतात, नमाज पठण करतात

    अहमदाबाद, 14 जानेवारी : 32 वर्षाच्या एका हिंदू तरुणाने मुस्लीम धर्माचा स्वीकार करण्याची तयारी सुरू केली आहे. मात्र गेल्या वर्षभरापासून त्याच्या मागणीवर सुनावणी झालेली नाही. आता त्याने गुजरात हायकोर्टाचं दार ठोठावलं आहे. (Desire to leave Hinduism and become a Muslim ) तरुणाने कोर्टात याचिका दाखल केली असून भरुच जिल्ह्यातील अधिकाऱ्यांना या प्रक्रियेत गती आणण्याचे निर्देश देण्याची मागणी केली आहे. तरुणाने सांगितलं की, अर्ज दाखल केल्यानंतरही एक वर्षापासून वाट पाहत आहे. याचिकाकर्ता जिग्नेश पटेल यांचे वकील एम टी सैय्यद यांनी गुरुवारी सांगितलं की, भरुचच्या कलेक्टरांनी एक वर्षांपासून अधिक वेळेपासून पटेल यांचा अर्ज थांबविला आहे. फेब्रुवारी 2020 मध्ये एका सब-डिविजनल मॅजिस्ट्रेटच्या तपासात याबाबत पॉझिटिव्ह सूचना देण्यात आली होती. त्यांना धर्मांतरण करण्याची परवानगी दिली जाऊ शकते, अशीही माहिती समोर आली होती. जस्टिस बेला त्रिवेदी यांनी नुकत्याच एका आदेशात जिल्हा कलेक्टर यांना निर्देश दिले की ते पटेल यांच्या अर्जावर जितके लवकर शक्य तितका लवकर निर्णय घेणार आहेत. (Desire to leave Hinduism and become a Muslim ) हे ही वाचा-कारजवळ एकटीच खेळत होती 5 वर्षांची लहानगी; रक्तबंबाळ अवस्थेत पोहोचली घरी वकील म्हणाले, इस्लाम स्वीकार करण्यासाठी कोणताही दबाव नाही पटेल यांच्या वकिलांनी सांगितलं की, भरुचमध्ये कलेक्टरांच्या परवानगीसाठी एक वर्षाहून अधिक वेळेपासून प्रलंबित आहे. पटेल यांचा अर्ज 2019 मध्ये कलेक्टरांकडे पाठविण्यात आला होता. यामध्ये त्याच्यावर कोणताही दबाव नसल्याचेही नमूद करण्यात आले होते. याचिकाकर्त्याने आपल्या प्रतिज्ञापत्रात म्हटले होते की, तो इस्लामबाबक आकर्षित होता आणि त्या धर्माचा स्वीकार करू इच्छितो. (Desire to leave Hinduism and become a Muslim ) याचिकाकर्त्याने सांगितलं की, तो गेल्या 6 वर्षांपासून मुस्लीम व्यक्ती प्रमाणे राहत आहे. त्यांनी सांगितलं की ते नियमित रमजानमध्ये रोजा ठेवतात, नमाज पठण करतात आणि धर्मासंबंधित सर्व नियमांचं पालन करतात.
    Published by:Meenal Gangurde
    First published:

    पुढील बातम्या