पोलिसात भरती होऊन बापाचा सूड उगवण्याची इच्छा अपूर्ण, त्यापूर्वीच 10 वीतील मुलीची आत्महत्या

मुलीच्या खोलीत एक सुसाइड नोट सापडली होती. ती नोट पाहिल्यानंतर पोलिसांच्या पायाखालची जमीन सरकली

मुलीच्या खोलीत एक सुसाइड नोट सापडली होती. ती नोट पाहिल्यानंतर पोलिसांच्या पायाखालची जमीन सरकली

  • Share this:
    आग्रा, 16 एप्रिल : उत्तर प्रदेशातील आग्रा जनपद भागातील एका दहावीच्या वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थिनीने आत्महत्या केली आहे. या विद्यार्थिनीचा मृतदेह घरात लटकलेल्या अवस्थेत मिळाला. याबाबत माहिती मिळताच पोलीस तातडीने घटनास्थळी गेले. यावेळी तिच्या खोलीत मिळालेल्या सुसाइड नोटमुळे वेगळाच खुलासा झाला आहे. या सुसाइड नोटमध्ये विद्यार्थिनीने धक्कादायक खुलासा केला आहे. या विद्यार्थिनीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला असून सुसाइड नोटच्या आधारावर मुलीच्या वडिलांना ताब्यात घेण्यात आले आहे. वडिलांकडून मारहाण केली जात होती किशोरी असं या मुलीचं नाव असून तिने सुसाइड नोटमध्ये खळबळजनक बाबींचा खुलासा केला आहे. ती वडिलांचा सूड घेण्यासाठी पोलीस दलात भरती होऊ इच्छित होती. मात्र तिला असह्य झाल्याने तिने आत्महत्या केली. रिपोर्टनुसार विद्यार्थिनीच्या वडिलांनी दुसरं लग्न केलं होतं. 25 वर्षांपूर्वी अमर सिंह यांची पहिली पत्नी आणि तीन मुलांचा आगीत मृत्यू झाला होता. त्यावेळी अमर सिंह यांच्याविरोधात हत्येचा आरोप होता. मात्र हे प्रकरण नंतर दाबण्यात आल्याचे अनेकांचे म्हणणे आहे. दुसऱ्या लग्नानंतर त्यांना तीन मुलं झाली. अमर सिंहवर आरोप आहे की तो पत्नी आणि मुलांना मारहाण करीत असे. याशिवाय घरातमध्ये भावांसोबत दारुची पार्टी केली जात आणि गोंधळ घातला जात, याशिवाय मुलांनाही मारहाण केली जात असल्याचाही आरोप केला आहे. यामुळे घरातील वातावरण बिघडलं होतं. किशोरी या भांडणामुळे वैतागली होती. तिला आपल्या वडिलांचा सूड घ्यायचा होता. मात्र कौटुंबिक वादातून तिचं धैर्य खचलं आणि तिने आत्महत्या केल्याची बाब समोर आली आहे. संबंधित - वक्फ बोर्डाने तयार केली Covid – 19 दफनभूमी, विश्व हिंदू परिषदेकडून विरोध 'त्या' पोलिसाची सब इन्स्पेक्टर पदावर बढती; हल्लेखोरांनी कापला होता हात  
    First published: