संसदेत पोहोचला Coronavirus? खासदारांनी सुरू केलं सेल्फ क्वारंटाइन

संसदेत पोहोचला Coronavirus? खासदारांनी सुरू केलं सेल्फ क्वारंटाइन

गायिका कनिका कपूरला (kanika kapoor) Coronavirus ची लागण झाल्याचं स्पष्ट झालं आणि खळबळ उडाली. कारण तिच्या संपर्कात आलेल्या खासदारांनी सेल्फ क्वारंटाइन करून घेतलं आहे. पण त्यापूर्वी त्यांनी संसदेच्या मीटिंगलाही हजेरी लावली होती.

  • Share this:

नवी दिल्ली, 20 मार्च : गायिका कनिका कपूरला (kanika kapoor) Coronavirus ची लागण झाल्याचं स्पष्ट झालं आणि खळबळ उडाली. कारण तिच्यामुळे 300 जणांना लागण होण्याचा धोका निर्माण होऊ शकतो. 10 दिवसांपूर्वी लंडनहून परतलेली कनिका त्यानंतर लखनौला एका पार्टीत सहभागी झाली होती. त्या पार्टीत 300 जण होते. याच पार्टीत राजस्थानच्या माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे आणि त्यांचा मुलगा खासदार दुष्यंत सहभागी झाले होते. या दोघांनीही स्वतःला वेगळं ठेवलं आहे. पण काळजीची बाब म्हणजे दुष्यंत यांनी लखनौच्या पार्टीला जाऊन आल्यापासून संसदेतही हजेरी लावली आहे. त्यामुळे संसदेत त्यांच्या संपर्कात आलेल्या इतर काही खासदारांनीही विलगीकरण (Self Quarantine )सुरू केलं आहे.

खबरदारीचा उपाय म्हणून आता खासदार डेरेक ओब्रायन यांनीसुद्धा सेल्फ क्वारंटाइन करून घेतलं आहे. ते इतरांपासून दूर राहणार आहेत. त्यासंदर्भातला Video देखील तृणमूल काँग्रेसच्या हँडलवरून प्रसिद्ध करण्यात आला आहे.

वाचा - गायिका कनिका कपूर Coronavirus पॉझिटीव्ह, 300 लोकांसोबत केली होती पार्टी

आपण खासदार दुष्यंत यांच्या संपर्कात आलो होतो. त्यांच्या शेजारी पार्लमेंट मीटिंगसाठी दोन तास बसलो होतो. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून आता सेल्फ क्वारंटाइन करत आहे, असं ओब्रायन यांनी सांगितलं आहे.

बेबी डॉल, चिटियां कलाईया सारखी सुपरहिट गाणी देणारी गायिका कनिका कपूर हिची कोरोना टेस्ट पॉझिटीव्ह आल्यानं आता ही साथ संसदेपर्यंत पोहोचली असण्याचा धोका निर्माण झाला आहे. कनिका ही काही दिवसांपूर्वीच लंडनहून परतली होती. त्यानंतर ती लखनऊमध्ये झालेल्या एका मेजवानीत उपस्थित होती. त्या मेजवानीला राजकारण आणि इतर क्षेत्रातले 300 दिग्गज उपस्थित होते असं समजतं.

मुलगा दुष्यंत यांच्या सासुरवाडीच्या लोकांसोबत आपण लखनऊनला एका भोजन समारंभात उपस्थित होतो. त्या कार्यक्रमाला कनिका होती. ती पॉझिटिव्ह असल्याचं पुढे आल्याने मी आणि दुष्यंत सेल्फ आयसोलेशनमध्ये असल्याचं वसुंधरा राजे यांनी Twitter वरून जाहीर केलं आहे.

अन्य बातम्या

Corona पॉझिटीव्ह आहे कनिका कपूर, लंडनला जाऊन कोणाला भेटली गायिका

जालन्यातील नागरिकांचा जीव भांड्यात, चीनमधून आलेल्या व्यक्तीचा रिपोर्ट निगेटिव्ह

First published: March 20, 2020, 8:50 PM IST

ताज्या बातम्या