वास्को द गामा पाटणा एक्स्प्रेस रुळावरून घसरली, 3 जणांचा मृत्यू

वास्को द गामा पाटणा एक्स्प्रेस रुळावरून घसरली, 3 जणांचा मृत्यू

उत्तर प्रदेशमधील चित्रकूटजवळ गोव्यातील वास्को- द- गामा इथून पाटणा इथं जाणाऱ्या एक्स्प्रेसला पहाटे अपघात झाला. एक्स्प्रेसचे 13 डबे रुळावरून घसरले असून या अपघातात 3 प्रवाशांचा मृत्यू झाला आहे.

  • Share this:

24 नोव्हेंबर : उत्तर प्रदेशमधील चित्रकूटजवळ गोव्यातील वास्को- द- गामा इथून पाटणा इथं जाणाऱ्या एक्स्प्रेसला पहाटे अपघात झाला. एक्स्प्रेसचे 13 डबे रुळावरून घसरले असून या अपघातात 3 प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. तर  10 प्रवासी जखमी झाले आहेत. जखमींवर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

पहाटे 4 वाजून 22 मिनिटांनी चित्रकूटजवळ माणिकपूर स्टेशनच्या सिग्नलजवळ हा अपघात झाला. अपघातात पटेल कुटुंबातल्या तिघांचा मृत्यू झालाय. ते बिहारला राहत होते.

घसरलेले 13 डबे सोडून उरलेले 7 डबे घेऊन ट्रेन पुढे गेली. काहींना खाजगी वाहनांनीही सोडण्यात आलंय. अपघाताची चौकशी सुरू आहे.

First published: November 24, 2017, 9:51 AM IST

ताज्या बातम्या