चिंता वाढली! कोरोना लॉकडाऊनमध्ये डिप्रेशनचा विळखा; आत्महत्या करू लागलेत लोक

चिंता वाढली! कोरोना लॉकडाऊनमध्ये डिप्रेशनचा विळखा; आत्महत्या करू लागलेत लोक

लॉकडाऊनमध्ये लोकांमधील हे वाढतं डिप्रेशन (depression) चिंतेचा विषय आहे.

  • Share this:

किशन जोशी/अल्मोडा, 28 मे : कोरोनाव्हायरसपासून (coronavirus) बचावासाठी लॉकडाऊन (lockdown) लागू करण्यात आला. मात्र याच लॉकडाऊनमुळे डिप्रेशनची (depression) प्रकरणं वाढू लागलीत. ज्यामुळे लोक आत्महत्येसारखं (suicide) टोकाचं पाऊल उचलू लागलेत. उत्तराखंडच्या अल्मोडामध्ये (almora) अशी बरीच प्रकरणं समोर आलीत.

कोरोनाच्या महासाथीमुळे देशव्यापी लॉकडाऊन आहे, ज्यामुळे कामधंदे, व्यवसाय ठप्प झालेत. लोकांवर बेरोजगारीचं संकट आहे. अशात लोक डिप्रेशनमध्ये जाऊ लागलेत, आत्महत्या करू लागलेत. अल्मोडामध्ये लॉकडाऊनदरम्यान 30 पेक्षा अधिक लोकांनी आत्महत्येचा प्रयत्न केला यामध्ये 5 लोकांचा मृत्यू झाला आहे.

रिपोर्टनुसार, गेल्या 2 महिन्यात 20 लोकांनी आत्महत्येचा प्रयत्न केला. यामध्ये 10 पुरुष आणि 10 महिला आहेत.  त्यांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्यापैकी पाच जणांचा मृत्यू झाला आहे. यात चार पुरुष आणि एका महिलेचा समावेश आहे. इतरांचा जीव डॉक्टरांनी वाचवला.

आकडेवारी पाहता पुरुष आणि महिला दोघांमध्येही डिप्रेशनचं प्रमाण सारखंच आहे आणि लोकांमधील हे वाढतं डिप्रेशन चिंतेचा विषय आहे.

हे वाचा - वडिलांचा मृतदेह घेऊन दिवसभर भटकत होता मुलगा; अखेर हिंदूंनी दफनासाठी दिली जागा

याशिवाय इतर रुग्णालयात बारापेक्षा अधिक डिप्रेशनच्या रुग्णांना दाखल करण्यात आलं, ज्यांनी आत्महत्येचा प्रयत्न केला. त्यामुळे चिंता अधिकच वाढली आहे.

जिल्हा रुग्णालयाच्या प्रमुख वैद्यकीय अधिकारी डॉ. आरसी पंत यांनी सांगितलं, "लॉकडाऊनदरम्यान आत्महत्येची प्रकरणं वेगानं वाढत आहेत. रुग्णालयात जी प्रकरणं येत आहेत, त्या रुग्णांचा जीव वाचवला जातोच आहे, शिवाय त्यांचं समुपदेशनही केलं जातं आहे"

हे वाचा - कोरोनामुळे जगावरील 'हे' संकट आणखी वाढणार; कोट्यवधी लोकांना सामना करावा लागणार

मानसोपचार विभागाच्या माजी विभागप्रमुख डॉ. अनुराधा शुक्ला यांनी सांगितलं, "आत्महत्या वाढण्याचं एक कारण म्हणजे भौतिक जीवनात असुरक्षिततेची भावना. लोकांना पोटापाण्याचा, आयुष्य कसं जगायचं याचा प्रश्न पडला आहे. यामुळे लोक खचू लागलेत"

लॉकाऊननंतर आयुष्यात काय बदल होईल असं वाटतं? या प्रश्नांची द्या उत्तरं

First published: May 28, 2020, 7:04 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading