काश्मीरमध्ये आता दहशतवाद्यांचा खात्मा करणार 'NSG'ची बलाढ्य फौज

काश्मीरमध्ये आता दहशतवाद्यांचा खात्मा करणार 'NSG'ची बलाढ्य फौज

गृह मंत्रालयाला असा विश्वास आहे की, एनएसजीच्या सैन्यामुळे दहशतवादाला आळा घालण्यासाठी मदत होईल. त्यामुळे हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे.

  • Share this:

जम्मू काश्मीर, 22 जून : रमजानचा महिना संपल्यापासून जम्मू काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ल्यांमध्ये वाढ झाली आहे. या दहशतवादी हल्ल्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी आणि त्यांना आळा घालण्यासाठी नॅशनल सिक्योरिटी गार्ड्स म्हणजेच 'NSG'ची टीम तैनात करण्यात आली आहे.

गृह मंत्रालयाला असा विश्वास आहे की, एनएसजीच्या सैन्यामुळे दहशतवादाला आळा घालण्यासाठी मदत होईल. त्यामुळे हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे.

एका महिनापूर्वी गृहमंत्रालयातील एक महत्वपूर्ण बैठकीत हा प्रस्ताव मंजूर करण्यात आला. मंत्रालयाशी संबंधित सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, व्हॅलीतील वाढत्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर, एनएसजीची हिट हाउस इंटरवेंशन टीम तैनात करण्यात आली आहे.

VIDEO RPFची दादागिरी शूट केल्यामुळे न्यूज18 लोकमतच्या प्रतिनिधीला धक्काबुक्की

दरम्यान, भाजप आणि पीडीपी सरकराची युती तुटल्यानंतर मेहबुबा मुफ्ती यांनी राजीनामा दिला. आणि त्यानंतर राज्यपाल राजवट सुरू झाली. पण तोंडावर आलेल्या अमरनाथ यात्रेला मोठा धोका आहे. म्हणून अमरनाथ यात्रेच्या मार्गावर सुद्धा एनएसजीच्या कमांडोंना तैनात करण्यात आलं आहे.

एनएसजी कमांडोंची ही अशी फौज आहे की, अमृतसर शहरात सुवर्ण मंदिरात लपलेल्या दहशतवाद्यांचा खात्मा करण्यासाठी एनएसजी कमांडोंचा वापर करण्यात आला होता.

लोक व्हिडिओ काढत बसले म्हणून ट्रेनखाली तुटलेला पाय स्वत:च उचलून प्लॅटफॉर्मवर चढला !

त्यानंतर मुंबईत झालेल्या 26/11 या हल्ल्यात, 2016मध्ये पठाणकोट एअरबेसवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात, गुजरातच्या अक्षरधाम मंदिरात झालेल्या दहशतवादी हल्ल्यात दहशतवाद्यांचा खात्मा करण्यासाठी देखील एनएसजी कमांडोंचा वापर करण्यात आला होता.

त्यामुळे ही शक्तीशाली आणि बलाढ्य फौज जम्मू काश्मीरचा दहशतवाद थांबण्यात यशस्वी होते का हे पाहणं आता महत्त्वाचं आहे.

हेही वाचा...

दुचाकीस्वाराला वाचवण्याच्या नादात शिवनेरी बस दुभाजकाला धडकून झाली पलटी !

आफ्रिकेत एड्स कार्यकर्त्यांनी औषधांबदल्यात ठेवले शरीर संबंध, वेश्यांचा केला वापर

First published: June 22, 2018, 9:41 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading