Home /News /national /

Deoghar rope-way accident : लोकांचा हादरवून टाकणारा आक्रोश, घटनेचा VIDEO आला समोर

Deoghar rope-way accident : लोकांचा हादरवून टाकणारा आक्रोश, घटनेचा VIDEO आला समोर

Deoghar accident video: सहसा लोक रोपवेवर डोलणाऱ्या डोंगरांचा आनंद घेत जातात. प्रत्येकाच्या हातात मोबाईल असतो. अनेकजण हा क्षण कॅमेऱ्याने शूट करत आहेत. अशीच एक व्यक्ती या सामान्य दिवसांप्रमाणेच कॅमेराने शूटिंग करत होती. हा अपघात होणार आहे, हे त्याला माहीत नव्हतं. अचानक सर्व काही एका क्षणात बदललं.

पुढे वाचा ...
  नवी दिल्ली, 13 एप्रिल : देवघरच्या त्रिकूट डोंगरावर झालेल्या भीषण अपघातात चार जणांना जीव गमवावा लागला आहे. 48 तासांनंतर बचावकार्य संपलं आहे. लष्कर आणि हवाई दलाच्या जवानांनी 1500 फूट उंचीवर रोपवेमध्ये अडकलेल्या 50 हून अधिक लोकांना वाचवलं आहे. ज्यावेळी ही घटना घडली, त्यावेळचा एक वेदनादायक व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये रोपवेवरील लोकांच्या किंकाळ्या ऐकून तुमचंही हृदय हेलावून जाईल. मृत्यूपूर्वी हे लोक देवाचा धावा करत आहेत, असं वाटतं. ओरडण्याचा हा काळ हृदय पिळवटून टाकणारा आहे. घटनेच्या अगदी काही क्षणांपूर्वीचा व्हिडिओ रोपवेवर चढलेले लोक देवाचा धावा करत आहेत. देव-देव म्हणतानाच या लोकांना काय करावं ते समजत नाही. हा व्हिडिओ सुमारे दोन मिनिटांचा आहे, ज्यात लोकांच्या किंकाळ्या ऐकू येतात. हा व्हिडिओ घटनेपूर्वीचा आहे.
  सहसा लोक रोपवेवर डोलणाऱ्या डोंगरांचा आनंद घेत जातात. प्रत्येकाच्या हातात मोबाईल असतो. अनेकजण हा क्षण कॅमेऱ्याने शूट करत आहेत. अशीच एक व्यक्ती या सामान्य दिवसांप्रमाणेच कॅमेराने शूटिंग करत होती. हा अपघात होणार आहे, हे त्याला माहीत नव्हतं. अचानक सर्व काही एका क्षणात बदललं. रोपवेवर दोन ट्रॉलींची टक्कर होताच लोक घाबरून ओरडू लागले आणि् घाबरून किंकाळ्या मारल्याचा आवाज स्पष्ट येऊ लागला. त्रिकूट पर्वत विशेष का आहे? झारखंडचे देवघर हे द्वादश ज्योतिर्लिंगासाठी प्रसिद्ध आहे. येथे रावणेश्वर महादेवाचे दर्शन होते. साधारणपणे लोक बिहारमधील सुलतानगंज ते देवघर गंगाजल घेऊन पायी चालत जातात. जल अर्पण केल्यानंतर ते जवळच्या प्रेक्षणीय स्थळांनाही भेट देतात. देवघराला बाबाधाम असंही म्हणतात. देवघरपासून त्रिकूट पर्वताचे अंतर सुमारे 22 किलोमीटर आहे. येथील पर्यटनस्थळे धार्मिक, वन्यजीव, साहस, ट्रेकिंग इत्यादींसाठी प्रसिद्ध आहेत. रोपवेवरून संपूर्ण शहराचे 360 अंशाचे दृश्य पाहता येते. येथे त्रिकटाचल महादेवाचे मंदिर आहे. संत दयानंद येथे राहत होते, असं मानलं जातं. त्रिकूट पर्वत 1500 फूट उंचीवर आहे. या पर्वतावर तीन टेकड्या आहेत ज्यांना ब्रह्मा, विष्णू आणि महेश्वर म्हणतात. त्याच्या जवळ गणेश आणि कार्तिक नावाच्या दोन लहान टेकड्या आहेत. त्रिकुटा पर्वत मयूरक्षी नदीचे उगमस्थान आहे. रोपवेमध्ये 25 केबल कार आहेत. एका कारमध्ये चार जणांसाठी सीट आहे. केबल कारने त्रिकूट पर्वतावर जाण्यासाठी 15 मिनिटं लागतात.
  Published by:Digital Desk
  First published:

  Tags: Accident, Jharkhand

  पुढील बातम्या