‘नोटबंदीमुळे काळा पैसा कमी झाला नाही’, माजी निवडणूक आयुक्तांनीच खोडून काढला सरकारचा दावा

‘नोटबंदीमुळे काळा पैसा कमी झाला नाही’, माजी निवडणूक आयुक्तांनीच खोडून काढला सरकारचा दावा

ओ.पी.रावत यांच्या या विधानामुळे सरकार वारंवार करत असलेल्या दाव्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 3 डिसेंबर : ‘नोटाबंदीमुळे काळ्या पैशाला आळा बसला नाही,’ असं स्पष्ट मत नुकतंच निवृत्त झालेले मुख्य निवडणूक आयुक्त ओ. पी. रावत यांनी नोंदवलं आहे. ओ.पी.रावत यांच्या या विधानामुळे सरकार वारंवार करत असलेल्या दाव्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे.

‘नोटबंदीनंतरच्या सर्व निवडणुकांमध्ये मोठ्या प्रमाणात रोकड जप्त करण्यात आली. सध्या ज्या निवडणुका सुरु आहेत, त्यात तर 200 कोटी रुपये हस्तगत करण्यात आले आहेत, असं रावत यांनी म्हटलं आहे.

माजी निवडणूक आयुक्तांच्या या विधानामुळे मोदी सरकारची मोठी अडचण झाली आहे. कारण नोटाबंदी केल्यानंतर केंद्र सरकारकडून वारंवार हा निर्णय कसा बरोबर आहे, याबाबत अनेक दावे करण्यात आले होते.

‘आधीच्या निवडणुकीपेक्षा जास्त रोकड जप्त’

‘नोटबंदीनंतर असं म्हटलं जात होतं की, निवडणुकीत होणारा पैशाचा गैरवापर कमी होईल. पण आता तर आधीच्या निवडणुकीपेक्षा अधिक रक्कम जप्त करण्यात आली आहे,’ असं ओ.पी.रावत म्हणाले.

दरम्यान, 8 नोव्हेंबर 2016 ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नोटबंदीची घोषणा केली. करचुकवेगिरी थांबवण्यासाठी हा निर्णय घेतला गेला, असं केंद्र सरकारचं म्हणणं आहे. पण त्यानंतर आलेल्या आरबीआय रिपोर्टमधून एक धक्कादायक खुलासा झाला होता. नोटाबंदीद्वारे बाद केलेला 99 टक्के पैसा परत बँकेत आला, असं या रिपोर्टमधून समोर आलं होतं.

VIDEO: मुख्यमंत्री फडणवीस आणि उद्धव ठाकरेंचा असा अंदाज तुम्ही पाहिलाच नसेल

First published: December 3, 2018, 4:46 PM IST

ताज्या बातम्या