Zomatoचे डिलिव्हरी बॉय संपावर; जेवण पोहोचवण्यास दिला नकार!

Zomatoचे डिलिव्हरी बॉय संपावर; जेवण पोहोचवण्यास दिला नकार!

Zomato या ऑनलाईन फूडची सेवा देणाऱ्या कंपनीचे डिलिव्हरी बॉय संपावर गेले आहेत.

  • Share this:

कोलकाता, 12 ऑगस्ट: Zomato या ऑनलाईन फूडची सेवा देणाऱ्या कंपनीचे डिलिव्हरी बॉय संपावर गेले आहेत. या संपाची दखल घेत कंपनीचे मुख्यालय असलेल्या दिल्लीतून एक टीम 16 ऑगस्ट रोजी हावडा येथे पोहोचणार आहे आणि संपावर गेलेल्या कर्मचाऱ्यांशी बोलणार असल्याचे सांगण्यात आले आहे. पश्चिम बंगालमधील हावडा जिल्ह्यातील Zomatoसाठी काम करणाऱ्या काही डिलिव्हरी बॉय संपावर गेले आहेत. केवळ हावडाच नाही तर संपूर्ण राज्यातील डिलिव्हरी बॉय कंपनीवर नाराज आहेत.

काय आहे प्रकरण...

बिफ (Beef) आणि ब्वॉयज पोर्क (Pork) हे दोन पदार्थ डिलिव्हरी करण्यावरून वाद सुरु झाला होता. या पदार्थांची डिलिव्हरी केल्यामुळे आमच्या धार्मिक भावना दुखावली जाते, अशी तक्रार काही कर्मचाऱ्यांनी केली होती. ज्या बॅगेतून आम्ही जेवण लोकांना डिलिव्हर करतो. तीच बॅग आम्ही घरी घेऊन जातो. बिफ सारखे पदार्थ डिलीव्हरी केल्यामुळे आमच्या भावना दुखवल्या जातात, असे बजरंग नाथ वर्मा या डिलिव्हरी बॉयने म्हटले होते. अशीच तक्रार मोहसिन अख्तर या डिलिव्हरी बॉयने देखील केली होती. या तक्रारीची दखल मंत्री राजीब बॅनर्जी यांनी देखील घेतली होती. कंपनीने कोणत्याही व्यक्तीला धर्माच्या विरुद्ध वागण्यासाठी जबरदस्ती करत येणार नाही. यासंदर्भात तक्रार मिळाल्यानंतर संबंधितांवर कारवाई केली जाईल असे बॅनर्जी म्हणाले होते.

बिफ आणि ब्वॉयज पोर्क डिलिव्हरी शिवाय डिलिव्हरी बॉयना देण्यात येणाऱ्या मानधनावरून देखील नाराजी आहे. यावरून संपूर्ण राज्यातील डिलिव्हरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी आंदोलन केले होते. काहीच दिवसांपू्र्वी Zomatoचा एक वाद समोर आला होता. जबलपूरमधील एका व्यक्तीने मुस्लिम डिलीव्हरी बॉय असल्याचे कारण देत ऑर्डर रद्द केली होती. त्यावरून सोशल मीडियावर देखील चर्चा झाली होती.

VIDEO :'..म्हणून ए चूप बसायचं' म्हटलो, चंद्रकांत पाटलांचा खुलासा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: Zomato
First Published: Aug 12, 2019 03:59 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading