मृत घोषित केलेलं बाळ अंत्यसंस्कारावेळी जिवंत आढळलं

बाळाला अंत्यसंस्कारासाठी जेव्हा घरी घेऊन जात होतो तेव्हा रस्त्यात त्याने हालचाल केली

बाळाला अंत्यसंस्कारासाठी जेव्हा घरी घेऊन जात होतो तेव्हा रस्त्यात त्याने हालचाल केली

  • Share this:
01 डिसेंबर : मृत घोषित केलेल्या बाळाला अंत्यंसस्काराच्या वेळी नेले असता ते जिवंत असल्याचा धक्कादायक प्रकार दिल्लीत घडलाय. दिल्लीतील प्रसिद्ध मॅक्स हाॅस्पिटलमध्ये हा प्रकार घडलाय. या हाॅस्पिटलविरोधात पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आलाय. काही दिवसांपूर्वी एका महिलेनं प्रिमॅच्योर जुळ्यांना जन्म दिला. जन्म झाल्यानंतर जुळ्या बाळातील मुलीचा मृत्यू झाला. तर दुसऱ्या बाळाची प्रकृती अस्वस्थ असल्यामुळे दिल्लीतील शालीमार बाग येथील मॅक्स हाॅस्पिटलमध्ये दाखल केलं होतं. मात्र तिथे काल सकाळी त्यांना मृत घोषित करण्यात आलं. त्यानंतर त्यांच्या परिवारानं त्यांना जेव्हा अंत्यसंस्काराच्या तयारीसाठी नेलं तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की एक बाळ जिवंत आहे. बाळाचे आजोबा प्रवीण यांनी सांगितलं की, आम्ही आमच्या बाळाला अंत्यसंस्कारासाठी जेव्हा घरी घेऊन जात होतो तेव्हा रस्त्यात त्याने हालचाल केली. आम्ही पार्सल उघडून पाहिलं तर बाळाचा श्वाच्छोश्वास सुरू होता. त्यांनी तातडीने बाळाला जवळील अग्रवाल हाॅस्पिटलमध्ये दाखल केलं. बाळाची प्रकृती आता स्थिर आहे. बाळाच्या कुटुंबियांनी घडलेल्या प्रकाराबाबत पोलिसांत तक्रार दाखल केलीये. मात्र, अद्याप या प्रकरणी कोणताही गुन्हा दाखल करण्यात आला नाही. पोलिसांनी या घटनेचा वैद्यकीय सेलकडे सोपवलाय. त्यांच्या तपासानंतर गुन्हा दाखल केला जाणार आहे. या घटनेनंतर मॅक्स हाॅस्पिटलने एक पत्रक प्रसिद्ध केलंय. या प्रकरणाची चौकशी सुरू करण्यात आलीये, जुळ्या मुलांच्या कुटुंबियांशी आम्ही संपर्क साधत आहोत असं हाॅस्पिटलनं सांगितलंय.
First published: