मराठी बातम्या /बातम्या /देश /

दिल्लीत Coronavirusने घेतला पहिला बळी, 69 वर्षीय महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू

दिल्लीत Coronavirusने घेतला पहिला बळी, 69 वर्षीय महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू

प्रातिनिधिक फोटो

प्रातिनिधिक फोटो

कोरोनाची लागण झालेल्या दिल्लीतील एका 69 वर्षीय महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.

    नवी दिल्ली, 13 मार्च : कोरोना व्हायरसच्या (Coronavirus) संकटाने संपूर्ण जग हादरून गेलेलं असताना भारतातही या व्हायरसने शिरकाव केला आहे. कोरोनाची लागण झालेल्या दिल्लीतील (Delhi) एका 69 वर्षीय महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. तब्येत बिघडल्याने या महिलेला रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यानंतर ही महिला काही काळासाठी व्हेंटिलेटरवर होती. आता तिचा मृत्यू झाला आहे. कोरोना व्हायरसमुळे काल (गुरुवारी)कर्नाटकातील एका व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतर आज दिल्लीत ही घटना समोर आली आहे. त्यामुळे कोरोनोमुळे भारतात झालेल्या बळींची संख्या आता 2 झाली आहे. कर्नाटकातल्या (Karnataka) कलबुर्गीमध्ये 76 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला होता. ही व्यक्ती कोरोनाव्हायरसची संशयित रुग्ण होती, अशी माहिती सरकारने दिली होती. या रुग्णाच्या चाचणीचे रिपोर्ट गुरुवारी आले असून त्याला Covid-19 ची लागण झाली होती, हे स्पष्ट झालं. दरम्यान, ‘कोरोना’चा प्रसार दिवसेंदिवस वाढत असल्याने जगभर चिंता व्यक्त करण्यात येत आहे. कोरोना आता 100 देशांमध्ये पसरला असून हजारो लोक त्याने ग्रस्त झाले आहेत. तर जगभरात मृत्यू पावलेल्यांची संख्याही वाढत आहेत. या पार्श्वभूमीवर सरकारने युद्धपातळीवर उपाययोजना करण्याचा निर्णय घेतलाय. तर यामुळे शेअर बाजार कोसळल्याने आर्थिक क्षेत्रालाही हादरा बसला आहे. हेही वाचा-कोण आहे ‘कोरोना’चा पहिला रुग्ण? ज्याच्यामुळे जगभर पसरला महाभंयकर व्हायरस ब्लॅक फ्रायडे - उद्योगांसोबतच शेअर मार्केटवरही (Share Market) मोठा परिणाम झाल्याचं पाहायला मिळत आहे. गेल्या पाच दिवसांपासून शेअर मार्केटमध्ये मोठी घसरण पाहायला मिळत आहे.आज सकाळी मार्केट सुरू होण्यापूर्वीच सेन्सेक्स (Sensex) तब्बल 2450 अंकानी घसरला होता. त्यानंतर काही वेळातच सेन्सेक्स तब्बल 3140 अंकानी घसरला आहे. आज सलग पाचव्या दिवशी सेन्सेक्सच्या पडझडीचं सत्र सुरुच असल्याचं दिसत आहे. निर्देशांक 30 हजारांच्या खाली गेल्यानं शेअर मार्केटला सर्किट लागल्याची माहिती समोर आली आहे. निर्देशांक नियंत्रणाबाहेर गेल्याने शेअर बाजारातील ट्रेडिंग (Trading) थांबविण्यात आलं आहे. आज सेन्सेक्स 3150 अंकांनी कोसळला असून निफ्टी 1000 अंकानी गडगडला आहे. मार्केट सध्या बंद करण्यात आलं असून 10.05 मिनिटांनी सुरू करण्यात येईल. गुगलच्या ऑफिसमध्ये कोरोना - गुगलच्या बंगळुरू ऑफिसमधील एका कर्मचाऱ्याला कोरोना व्हायरसची लागण झाल्याचं समोर आलं आहे. या तरुणाला तसे आधी सिमटर्मस दिसले होते. त्याची टेस्ट करण्यात आल्यानंतर कोरोना व्हायरसची लागण झाल्याचं स्पष्ट झालं आहे. कोरोना व्हायरसचा वाढता संसर्ग लक्षात घेऊन गुगलने आपलं बंगळुरूमधील कार्यालय काही दिवस बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. कोरोनामुळे गुगलच्या कार्यालयातील अनेक कर्मचाऱ्यांना घरून काम करण्यास सांगण्यात आले आहे. 10 एप्रिलपर्यंत हे कर्मचारी घरी राहून ऑफिसचं काम करतील.
    Published by:Akshay Shitole
    First published:

    Tags: Corona, Coronavirus in delhi

    पुढील बातम्या