मराठी बातम्या /बातम्या /देश /Delhi: भरदिवसा तरुणाच्या पोटात चाकू खुपसला मग् डोक्यात घातली खुर्ची, घटनेचा LIVE VIDEO

Delhi: भरदिवसा तरुणाच्या पोटात चाकू खुपसला मग् डोक्यात घातली खुर्ची, घटनेचा LIVE VIDEO

Crime News: भरदिवसा एका तरुणावर टोळक्याने हल्ला केला आणि चाकू खुपसून त्याची निर्घृण हत्या केल्याची घटना समोर आली आहे. ही घटना मोबाइल कॅमेऱ्यात कैद झाली आहे.

Crime News: भरदिवसा एका तरुणावर टोळक्याने हल्ला केला आणि चाकू खुपसून त्याची निर्घृण हत्या केल्याची घटना समोर आली आहे. ही घटना मोबाइल कॅमेऱ्यात कैद झाली आहे.

Crime News: भरदिवसा एका तरुणावर टोळक्याने हल्ला केला आणि चाकू खुपसून त्याची निर्घृण हत्या केल्याची घटना समोर आली आहे. ही घटना मोबाइल कॅमेऱ्यात कैद झाली आहे.

शंकर आनंद, प्रतिनिधी

नवी दिल्ली, 30 डिसेंबर : देशाची राजधानी दिल्लीत (Delhi) भरदिवसा एका तरुणाची चाकू खुपसून हत्या (youth brutally murdered) करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. तीन जणांच्या टोळक्याने एका तरुणावर हल्ला केला. ही घटना दिल्लीतील सीमापूरी (Seemapuri Delhi) भागात घडली आहे. या घटनेचा एक व्हिडीओ सुद्धा समोर आला असून तो जोरदार व्हायरलही होत आहे. (Delhi youth killed with sharp weapon, incident caught in camera)

बुधवारी सायंकाळी दिल्लीतील सीमापूरी भागात ही घटना घडली असल्याची माहिती समोर आली आहे. तीन तरुणांनी एका तरुणाला घेरलं आणि भर बाजारात त्याच्यावर हल्ला केला. हल्ल्यात या तरुणाचा मृत्यू झाला आहे. मृतक तरुणाचे नाव शाहरूख असे असल्याची माहिती समोर आली आहे.

वाचा : दहिसरमध्ये SBI बँकेत दरोडा, दरोडेखोरांच्या गोळीबारात कर्मचाऱ्याचा मृत्यू

ही संपूर्ण घटना घटनास्थळी असलेल्या सीसीटीव्हीत कैद झाली आहे. बाजारात तरुणावर चाकू हल्ला करण्यात आला तर दुसऱ्या तरुणाकडून पीडिताच्या डोक्यात खुर्ची मारण्यात आली. हा प्रकार बाजारात घडत असताना इतर नागरिक तेथे उपस्थित होते. मात्र, कुणीही आरोपींना रोखण्याचा प्रयत्न केला नाही.

तीन जणांच्या टोळक्याने केलेल्या हल्यात शाहरूख नावाचा तरुण गंभीर जखमी झाला होता. त्याला उपचारासाठी जीटीबी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारा दरम्यान त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे.

वाचा : Insta Post मुळे केला खून, अल्पवयीन मुलावर चाकूचे सपासप वार

पोलिसांनी सांगितले की, आरोपींचा शोध सुरू आहे. प्राथमिक तपासात असे दिसत आहे की, जुन्या वादातून ही हत्या झाली असावा असा अंदाज आहे. या प्रकरणी पोलिसांनी दोन जणांना अटक केली आहे.

कांदा मागण्यावरून हॉटेल स्टाफची तरुणांना जबर मारहाण

रेस्टॉरंटमध्ये कांदा मागण्याच्या मुद्द्यावरून मॅनेजर आणि काही तरुणांमध्ये वाद झाल्यावर तुंबळ हाणामारी झाल्याची घटना कोलकाता येथून समोर आली आहे. काही तरुण रात्री 11 वाजता रेस्टॉरंटमध्ये जेवण्यासाठी आले होते. त्यावेळी त्यांनी सोबत दारू आणली होती, असा दावा रेस्टॉरंटच्या वतीनं करण्यात आला आहे, तर केवळ कांदा मागण्याच्या मुद्द्यावरून हा राडा झाल्याचा दावा तरुणांनी केला आहे.

आपण केवळ कांदा मागितला होता. त्यावरून हा वाद सुरू झाला होता. आपण दारू पित नव्हतो, असा दावा तरुणांनी केला आहे. कांद्याच्या किरकोळ मुद्द्यावरून रेस्टॉरंटच्या स्टाफनं उलट उत्तर दिल्यामुळे वाद पेटला आणि त्यातून रेस्टॉरंटच्या कर्मचाऱ्यांनी आम्हाला रक्तबंबाळ होईपर्यंत मारहाण केली, असा दावा तरुणांच्या वतीनं करण्यात आला आहे.

First published:
top videos

    Tags: Cctv footage, Crime, Delhi