VIDEO : कोरोना, हवा प्रदूषणासोबत आणखीन एक मोठं संकट, नदीवर आली फेसाची चादर

VIDEO : कोरोना, हवा प्रदूषणासोबत आणखीन एक मोठं संकट, नदीवर आली फेसाची चादर

देशाची राजधानी दिल्लीत केवळ हवेचं प्रदूषण आणि कोरोनाच नाही तर आणखीन एक मोठं संकट चालून येत आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 04 नोव्हेंबर : देशाची राजधानी दिल्लीत केवळ हवेचं प्रदूषण आणि कोरोनाच नाही तर आणखीन एक मोठं संकट चालून येत आहे. हवेसोबतच आता मोठ्या प्रमाणात पाण्यातही प्रदूषण होत असल्याचा एक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमुळे दिल्लीवासीयांच्या काळजात धस्स होणार आहे. याचं कारण म्हणजे यमुना नदीवर संपूर्ण पाण्यावर फेसाचे तरंग उठल्याचा व्हिडीओ समोर आला आहे.

यमुना नदीत प्रदूषणामुळे विषारी फेस तयार होण्यास सुरूवात झाली आहे. विशेषत: दिल्लीच्या कालिंदी कुंज येथे असलेल्या यमुना नदीत फेस दिसू लागला आहे. दूरवरुन बघितले तर हे तुकडे जणू यमुनेत पांढरे ढग खाली उतरल्यासारखे वाटतात. तिथल्या नागरिकांनी ही दृश्यं कॅमेऱ्यात कैद केली आहेत. हा वाढणारा फेस कोरोना काळात चिंता वाढवणारा आहे. बिहार आणि दिल्लीकरांसाठी ही धोक्याची घंटाच म्हणायला हवी.

हे वाचा-4 वर्षांच्या चिमुकल्यानं मृत्यूला दिला हुल ,91तासांनंतर ढिगाऱ्याखालून जिवंत काढल

बिहारमध्ये यमुना नदीतच छट पूजा करण्याची परंपरा आहे. अशा परिस्थितीत पूजा करण्यासाठी नागरिक गेले तर वेगवेगळ्या प्रकारच्या आजाराला आमंत्रण देण्यासारखं आहे. अनेकांनी यमुना नदीवर ढग अवतरल्याचं म्हटलं आहे तर काही युझर्सनी चिंता देखील व्यक्त केली आहे.

प्रत्यक्षात मागील वर्षी छठ पूजेच्या वेळी यमुना नदीत फेस आला होता. अशा परिस्थितीत भाविकांना यमुना नदीत फोमच्या पाण्यामध्ये उभा असलेला छठ पूजा करावी लागली. त्यावेळी अशाप्रकारचे व्हिडीओ समोर आले होते. आता पुन्हा एकदा हे व्हिडीओ समोर आल्यामुळे चिंता व्यक्त केली जात आहे.

Published by: Kranti Kanetkar
First published: November 4, 2020, 3:04 PM IST
Tags:

ताज्या बातम्या