नवी दिल्ली, 30 जून : देशाची राजधानी असलेल्या दिल्लीत एका धक्कादायक असा प्रकार समोर आला आहे. Live In Partnerला वश करण्यासाठी एक महिला आपल्या Live In Partnerच्या जेवणात रक्त मिसळत होती. एका मांत्रिकाच्या सांगण्यावरून तिनं हे पाऊल उचललं. यावरच न थांबता महिला वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी देखील करत होती. यासाठी देखील तिला मांत्रिकाचा सल्ला मिळत होता. Live In Partnerच्या खांद्यावरील केस काढून त्यावर देखील वेगवेगळ्या प्रकारच्या मांत्रिक गोष्टी ही महिला करत होती. या साऱ्या प्रकारामुळे कंटाळलेल्या Live In Partnerनं अखेर एक दिवशी महिलेवर हल्ला केला. यामध्ये महिला जखमी झाली. पोलिसांनी Live In Partnerवर हल्ल्याप्रकरणी तरूणाला अटक केली आहे. त्याचं नाव अरूण असं आहे.
दोघांचंही झालंय लग्न
मुख्य बाब म्हणजे Live In Partnerमध्ये राहणाऱ्या दोघांचंही लग्न झालं आहे. दोघंही मुळचे बिहारचे आहेत. आरोपी हा महिलाचा दीर लागतो. दोघंही 3 वर्षापूर्वी एकमेकांच्या जवळ आले. त्यानंतर अडीच वर्षापूर्वी दोघंही दिल्लीत येऊन राहू लागले. तर, आजादपूरमधील मांत्रिकाच्या सांगण्यावरून महिलेनं सर्व गोष्टी केल्या होत्या. अखेर कंटाळलेल्या तरूणानं आपल्या Live In Partnerवर हल्ला केला.
ताडोबात मधू वाघिणीसह 3 बछड्यांचं दर्शन, इतर महत्त्वाच्या 18 बातम्या