मराठी बातम्या /बातम्या /देश /

Delhi Weather : दिल्ली-एनसीआरमध्ये सकाळपासूनच पावसाची हजेरी, उष्णतेपासून दिलासा

Delhi Weather : दिल्ली-एनसीआरमध्ये सकाळपासूनच पावसाची हजेरी, उष्णतेपासून दिलासा

दिल्लीसह आसपासच्या परिसरात शुक्रवार सकाळची सुरुवातच पावसासोबत (Delhi Weather Update) झाली आहे. हवामान खात्यानं आधीच अंदाज वर्तवला होता, की उष्णतेत झालेल्या वाढीमुळे २४ तासांमध्ये हवेचा वेग वाढून पावसाची शक्यता आहे.

नवी दिल्ली 12 मार्च : दिल्लीसह आसपासच्या परिसरात शुक्रवार सकाळची सुरुवातच पावसासोबत (Delhi Weather Update) झाली आहे. दिल्ली, नोएडा, गाजियाबाद आणि गुरुग्रामसह एनसीआरमधील अनेक भागांमध्ये पावसानं हजेरी लावली आहे. हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार, पुढील एक-दोन दिवस हलक्या पावसाचा अंदाज आहे. याशिवाय काही भागांमध्ये गारपीट होण्याची शक्यताही वर्तवण्यात आली आहे. हवामान खात्यानं आधीच अंदाज वर्तवला होता, की उष्णतेत झालेल्या वाढीमुळे २४ तासांमध्ये हवेचा वेग वाढून पावसाची शक्यता आहे.

यंदा दिल्लीमध्ये भयंकर उष्णता असणार आहे, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. गुरुवारीदेखील उष्णतेनं मागच्या १० वर्षांचा रेकॉर्ड तोडला आहे. दिल्लीतील कमाल तापमान 35 अंश सेल्सिअस इतकं नोंदवलं गेलं. हवामान विभागानं गुरुवारी दिल्ली आणि एनसीआरमध्ये हलक्या पावसाचा अंदाज वर्तवला होता. मात्र, याउलट गुरुवारी कडक ऊन पाहायला मिळालं. हवामान विभागाच्या आकड्यांनुसार, गुरुवारी दिल्लीतील कमाल तापमान ३५.२ अंश सेल्सिअस इतकं नोंदवलं गेलं. हे 11 मार्च 2012 पासून आतापर्यंतचं सर्वाधिक तापमान होतं. तर, किमान तापमान साधारण तापमानापेक्षा तीन डिग्री अधिक म्हणजेच १७.२ अंश सेल्सिअस इतकं नोंदवलं गेलं.

दिल्ली एनसीआरमधील हवा पुन्हा एकदा दुषित झाली आहे. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण बोर्डाकडून जारी करण्यात आलेल्या एअर कॉलिटी बुलेटिननुसार, गुरुवारी दिल्लीचा एअर कॉलिटी इंडेक्स २४२ एक्यूआय नोंदवला गेला आहे. फरीदाबादचा २७७, गाजियाबाद २८७, ग्रेटर नोएडा ३०७ आणि गुरुग्रामचा २६८ इतका नोंदवला गेला आहे.

मंगळवारी रात्री राजधानी दिल्लीत रात्री 9 वाजता दिल्ली आणि एनसीआरच्या अनेक भागांमध्ये मुसळधार पाऊस कोसळला. यानंतर नागरिकांना उष्णतेपासून काही प्रमाणात दिलासा मिळाला. याआधी एक दिवस दिल्लीतील किमान तापमान 18.8 अंश सेल्सिअस इतकं नोंदवलं गेलं होतं. हवामान शास्त्रज्ञांनी यादिवशी ढगाळ वातावरण आणि हलक्या पावसाची शक्यता वर्तवली होती.

First published:

Tags: Rain fall, Weather update