Home /News /national /

वक्फ बोर्डाने तयार केली Covid – 19 दफनभूमी, विश्व हिंदू परिषदेने केला विरोध

वक्फ बोर्डाने तयार केली Covid – 19 दफनभूमी, विश्व हिंदू परिषदेने केला विरोध

प्रातिनिधिक फोटो

प्रातिनिधिक फोटो

कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांना दफन करण्यात अडचणी जाणवत आहेत. यासाठी वक्फ बोर्डाने आरोग्य विभागाला पत्र लिहून कळविले आहे.

    नवी दिल्ली, 16 एप्रिल : कोरोना व्हायरसमुळे (Coronavirus) मृत्यू झालेल्यांना दफन करण्यासाठी दिल्ली वक्फ बोर्डाने (Delhi Waqf Board) एक मोठा निर्णय घेतला आहे. बोर्डाने दिल्लीतील एका दफनभूमीला (Graveyard) कोविड – 19 असं नाव दिलं आहे. या दफनभूमीत कोरोना संसर्गामुळे मृत्यू झालेल्यांना दफन करण्यात येणार आहे. बोर्डाने याबाबत दिल्लीच्या आरोग्य विभागाला पत्रक लिहून माहिती दिली आहे. बोर्डाचं म्हणणं आहे की, माहितीअभावी लोक कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांना कब्रिस्तानमध्ये दफन करू देत नाही. अनेक राज्यांमध्ये अशा प्रकारच्या अडचणी जाणवत आहेत. कोरोना दफनभूमीच्या निमित्ताने दिल्लीतील एका मोठ्या मिलेनियम पार्कवर ताबा मिळविण्याचा प्रयत्न करीत असल्याचे  विश्व हिंदू परिषदेचे म्हणणे आहे. दिल्ली वक्फ बोर्डाने कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांना दफन करण्याची अडचण दूर करण्यासाठी रिंग रोडवर मिलेनियम पार्कजवळी जदीद कुरुस्तान नावाच्या प्रसिद्ध दफनभूमीला कोविड – 19 कब्रिस्तान बनवले आहे. येथे कोणत्याही भागातील कोरोना रुग्णांचा मृतदेह दफन केला जाऊ शकतो. बोर्डाने आरोग्य विभागाकडे दिलेल्या पत्रात म्हटले आहे की, तुम्ही विविध रुग्णालयांना याबाबत सूचित करा की कोरोना रुग्णाच्या मृत्यूनंतर ते रिंग रोड येथील जदीद कुरुस्तानमध्ये मृतदेह दफन करू शकता. विश्व हिंदू परिषदेने दर्शवला विरोध कोरोना दफनभूतीवर विश्व हिंदू परिषदेने विरोध दर्शविला आहे. दिल्लीतील एक मोठं पार्क मिलेनियम पार्कवर ताबा मिळविण्याचा प्रयत्न असल्याचे परिषदेचे म्हणणे आहे. कोरोनामुळे मृत्यू झालेल्याना दफन नाही तर दहन करण्याची गरज आहे. परिषदेने कोरोना कब्रिस्तानला पाकिस्तानी विचार म्हटले आहे. विनोद बंसल यांनी दिल्ली सरकारने मागणी केली आहे की ते दिल्ली वक्फ बोर्डाची मागणी फेटाळावी. संबंधित -'त्या' पोलिसाची सब इन्स्पेक्टर पदावर बढती; हल्लेखोरांनी कापला होता हात तबलिगी जमातचे प्रमुख मौलाना साद यांना ED चा दणका, लवकरच चौकशीला बोलावणार संपादन - मीनल गांगुर्डे
    Published by:Meenal Gangurde
    First published:

    Tags: Corona virus in india

    पुढील बातम्या