Home /News /national /

दिल्ली हिंसाचारानंतर भडकली 'दंगल गर्ल'; आंब्याच्या प्रश्नाऐवजी शांत झोप कशी लागते विचारा', मोदींसह, अक्षय कुमारलाही टोला

दिल्ली हिंसाचारानंतर भडकली 'दंगल गर्ल'; आंब्याच्या प्रश्नाऐवजी शांत झोप कशी लागते विचारा', मोदींसह, अक्षय कुमारलाही टोला

दंगल (Dangal) फेम झायरा वसीमने (Zaira Wasim) काही महिन्यांपूर्वी बॉलिवूड सोडण्याचा निर्णय घेतला होता.

दंगल (Dangal) फेम झायरा वसीमने (Zaira Wasim) काही महिन्यांपूर्वी बॉलिवूड सोडण्याचा निर्णय घेतला होता.

अभिनेता अक्षय कुमारने (akshay kumar) पंतप्रधान मोदींना (PM modi) मुलाखतीत विचारलेल्या आंब्याच्या (mango) प्रश्नावरून झायरा वसीमने (zaira wasim) दोघांनाही खोचक टोमणा मारला आहे.

  नवी दिल्ली, 28 फेब्रुवारी : दिल्ली हिंसाचार (delhi violence) प्रकरणी अनेक कलाकारांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत, त्यात आता दंगल गर्ल झायरा वसीमच्या (zaira wasim) प्रतिक्रियेनं सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. ‘तुम्ही आंबे कसे खाता याऐवजी तुम्हाला रात्री शांत झोप कशी लागते हा प्रश्न विचारायला पाहिजे’, असा सणसणीत टोला झायरा वसीमने पंतप्रधान मोदी आणि अभिनेता अक्षय कुमारला लगावला आहे. दिल्लीत नागरिकत्व संशोधन कायद्यावरून (Citizenship Amendment Act) हिंसक आंदोलन सुरू आहे. त्याबाबत आपलं मत मांडताना झायरा वसीमनं अभिनेता अक्षय कुमारने (akshay kumar) पंतप्रधान मोदींना (PM modi) विचारलेल्या आंब्याच्या (mango) प्रश्नावरूचा संदर्भ घेतला आहे आणि दोघांनाही खोचक टोमणा मारला आहे. गेल्या वर्षी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अभिनेता अक्षय कुमारने पंतप्रधान नरेंद्र मोदींची मुलाखत घेतली होती. या मुलाखतीत पंतप्रधान मोदींचं बालपण, त्यांचा राजकीय प्रवास याबाबत जाणून घेण्यात आलं होतं. विशेष म्हणजे 'तुम्हाला आंबे खायला आवडतात का?' असा प्रश्नही अक्षय कुमारने मोदींना विचारला होता.  अक्षय कुमारने मोदींची घेतलेली मुलाखत आणि त्या मुलाखतीत विचारलेला आंब्याचा प्रश्न त्यावेळी सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला होता. आता सुधारित नागरिकत्व कायद्यावरून (सीएए) दिल्लीत हिंसक आंदोलन झालं. या हिंचासाराविरोधात अनेक कलाकारांनी आपली मतं मांडलीत. झायराने अभिनयक्षेत्र सोडलं आहे. मात्र सोशल मीडियावर ती सक्रिय आहे. चालू घडामोडींवर ती ट्विटरच्या माध्यमातून व्यक्त होत असते.
  अन्य बातम्या दिल्ली जळत असताना अमित शहा कुठे आहेत? शिवसेनेची गृहमंत्र्यांवर सडकून टीका दिल्ली हिंसाचार : 'आप'चे ताहिर हुसैन यांची पक्षातून हकालपट्टी
  Published by:Priya Lad
  First published:

  Tags: Delhi, Zaira wasim

  पुढील बातम्या