दिल्ली : नाव विचारलं आणि थेट 5 गोळ्या झाडल्या, 11 दिवसांपूर्वी लग्न झालेल्या तरुणाची हत्या

11 दिवसांपूर्वी लग्न झालेल्या अशफाक या तरूणाची दिल्ली हिंसाचारावेळी गोळी झाडून हत्या करण्यात आली आहे.

11 दिवसांपूर्वी लग्न झालेल्या अशफाक या तरूणाची दिल्ली हिंसाचारावेळी गोळी झाडून हत्या करण्यात आली आहे.

  • Share this:
    नवी दिल्ली, 27 फेब्रुवारी : दिल्लीत उसळलेल्या हिंसाचारात अनेक कुटुंब उद्धवस्त झाली आहेत. अशातच दिल्लीच्या मुस्तफाबादमधील एक काळीज पिळवटून टाकणारी घटना समोर आली आहे. 11 दिवसांपूर्वी लग्न झालेल्या अशफाक या तरूणाची दिल्ली हिंसाचारावेळी गोळी झाडून हत्या करण्यात आली आहे. 'बृजपुरी इथं रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या अशफाक याला त्याच्या मित्रांनी आधी जीटीबी रुग्णालयात नेण्याचा प्रयत्न केला. मात्र चहुबाजूला होत असलेल्या हिंसेमुळे ते रुग्णालयापर्यंत पोहोचू शकले नाहीत. नंतर त्याला जवळच्याच एका रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र तिथं 2 तासांनंतर त्याचा मृत्यू झाला,' अशी माहिती मृत अशफाकचा भावाने दिली आहे. अशफाकच्या मृत्यूनंतर रुग्णालयाच्या बाहेर उभा असणारा त्याचा भाऊ मुदस्सिर डोळ्यांमध्ये अश्रू घेऊन हंबरडा फोडणाऱ्या आपल्या नातेवाईकांना समजावण्याचा प्रयत्न करत होता. फक्त 11 दिवसांपूर्वी अशफाकचं लग्न झालं होतं. अशफाकच्या पत्नीला त्याच्या हत्येची बातमी कळताच धक्क्याने ती बेशुद्ध पडली. दिल्ली हिंसाचार: 2 SIT करणार चौकशी, 48 वर पोहोचला मृतांचा आकडा 'अशफाक हा मंगळवारी संध्याकाळी आपल्या मित्रांसोबत ऑफिसमधून घरी परतत होता. बृजपुरी पुलिया इथं पोहोचल्यानंतर काही दंगेखोरांनी अशफाक आणि त्याच्या मित्रांना पकडलं. आधी त्यांना त्यांचं नाव विचारण्यात आलं. त्याचवेळी अशफाकचे इतर मित्र तिथून पळून जाण्यास यशस्वी झाले. मात्र अशफाक मात्र तिथंच अडकून पडला. नाव सांगताच त्याच्या छातीवर 5 गोळ्या झाडण्यात आल्या. तसंच इतर शस्त्रांच्या साहाय्याने त्याच्यावर वार करण्यात आले,' असं मुदस्सिरने सांगितलं. तिथून काही अंतरावर असणारे त्याचे मित्र इच्छा असूनही त्याला वाचवू शकले नाहीत. अखेर अशफाकवर हल्ला करणारे दंगेखोर तिथून गेल्यानंतर त्याच्या मित्रांनी त्याला रुग्णालयात नेलं. मात्र अशफाकचा जीव ते वाचवू शकले नाहीत.
    First published: