लग्नाचा वाढदिवस, सोमवारचा उपवास आणि 3 मुलांची पितृछाया; अश्रू आणणारा रतनलाल यांचा शेवटचा दिवस

लग्नाचा वाढदिवस, सोमवारचा उपवास आणि 3 मुलांची पितृछाया; अश्रू आणणारा रतनलाल यांचा शेवटचा दिवस

पोलीस हेड कॉन्स्टेबल रतनलाल यांच्या मृत्यूबाबत आई आणि पत्नी आहेत अनभिज्ञ

  • Share this:

नवी दिल्ली, 26 फेब्रुवारी : ईशान्य दिल्लीत सुरू असलेल्या हिंसाचारात आतापर्यंत 20 जणांचा मृत्यू झाला आहे. या हिंसेत मृत्युमुखी झालेल्या पोलीस हेड कॉन्स्टेबल रतनलाल यांचे नातेवाईक दिल्लीत धरणे आंदोलनासाठी बसले आहेत. भजनपुरा इथे झालेल्या हिंसेमध्ये रतनलाल यांचा गोळी लागून मृत्यू झाला होता. रतनलाल यांच्या पत्नी आणि मुलांना या बद्दल अद्याप कोणतीही माहिती देण्यात आली नाही. मात्र त्यांना गोळी लागल्याचं वृत्त त्यांच्या पत्नीने टीव्हीवर पाहिलं होतं. त्यानंतर त्या सातत्यानं भोवळ येऊन पडत आहेत आणि रडत आहेत. त्यांच्या पत्नीला रतनलाल अजूनही परत येतील अशी आशा आहे. त्यांच्या वाटेकडे मुलं आणि पत्नी डोळे लावून बसले आहेत. रतनलाल घरी आल्याशिवाय जेवणार नाही असा पवित्राच त्यांनी घेतला आहे. तर रतनलाल यांच्या मृत्यूला दोन दिवस उलटूनही त्यांच्या आईलाही आपला मुलगा शहीद माहिती त्यांना न दिल्याचं रतनलाल यांच्या भावाने सांगितलं आहे.

'त्या' दिवशी नेमकं काय घडलं?

शनिवारी रतनलाल यांच्या लग्नाचा 16वा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा केला. त्यानंतर रतनलाल यांची तब्येत बिघडली होती. त्यांची तब्येत बरी नसतानाही त्यांना हिंचाराच्यामुळे ड्युटीवर जावं लागलं होतं. त्याच दिवशी त्यांचा सोमवारचा उपासही होता. नेहमी प्रमाणी तयार होऊन ते ड्युटीवर जे गेले त्यानंतर आजपर्यंत ते पुन्हा घरी आलेच नाहीत. तर हिंसाचारादरम्यान रतनलाल यांना गोळी लागली. त्यांना रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आलं मात्र त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या पत्नीने रतनलाल यांना गोळी लागल्याचं वृत्तं टीव्हीवर पाहिलं होतं. त्यानंतर शेजारच्यांनी तिचा टीव्ही बंद केला. रतनलाल बरे होऊन येतील अशी आशा त्यांची पत्नी लावून बसली आहे. तर त्यांच्या तीन मुलांपैकी मोठ्या मुलीलाच आपले वडील परत येणार नाहीत हे माहीत आहे.

हेही वाचा-दंगलखोरांनी 19 वर्षीय युवकाच्या डोक्यात खुपसलं ड्रिलमशीन, पाहा थरारक PHOTO

कोण होते रतनलाल?

राजस्थानमधील एक छोट्याशा गावात राहणारे रतनलाल सुरुवातील रॉबर्ट वाड्रा यांच्या सुरक्षा व्यवस्थेचं काम पाहात होते. त्यानंतर त्याचं प्रमोशन झालं आणि हेड कॉन्स्टेबल म्हणून त्यांना दिल्लीत पोस्टींग मिळालं. त्यांच्या मागे पत्नी आणि तीन मुलं असं कुटुंब आहे. तर रतनलाल यांच्या घरी त्यांची आई आणि दोन भाऊ आहेत. रतनलाल हे सर्वात मोठे होते. त्यांनी आपल्या कुटुंबासाठी लोन काढून नवीन घरही घेतलं होतं. त्यांचा छोटा सुखी संसार सुरू होता.

काय आहे नातेवाईकांची मागणी

दिल्लीत हिंसाचारात पोलीस हेड कॉन्स्टेबल रतनलाल यांचा मृत्यू झाला आहे. त्यांना शहीद असा दर्जा देण्यात यावा. त्यांच्या मागे असलेल्या पत्नीसाठी सरकारी नोकरी द्यावी तर मुलांच्या शिक्षणाचा खर्चही प्रशासनानं करण्याची मागणी नातेवाईकांनी केली आहे. जोपर्यंत या मागण्या पूर्ण होत नाहीत तोपर्यंत रतनलाल यांच्यावर अंत्यसंस्कार करणार नाही असा पवित्रा नातेवाईकांनी घेतला आहे. रतनलाल यांचा शवविच्छेदन अहवालही आला नाही असा आरोपी नातेवाईकांनी केला आहे.

हेही वाचा-बंदूकीच्या समोर उभ्या असलेल्या 'त्या' पोलीस अधिकाऱ्याच्या शौर्याला सलाम, म्हणाले

First published: February 26, 2020, 12:21 PM IST

ताज्या बातम्या