मराठी बातम्या /बातम्या /देश /

दिल्ली हिंसाचार: उमर खालिदवर चार्जशीट दाखल, वाचा काय आहेत आरोप

दिल्ली हिंसाचार: उमर खालिदवर चार्जशीट दाखल, वाचा काय आहेत आरोप

 देशाची राजधानी दिल्लीमध्ये झालेल्या हिंसाचाराचा (Delhi Violence) आरोपी उमर खालिदच्या (Omar Khalid) विरोधात दिल्ली पोलिसांच्या (Delhi Police) क्राईम ब्रँचनं गुरुवारी चार्जशीट दाखल केली.

  • Published by:  News18 Desk

दिल्ली, 31 डिसेंबर: देशाची राजधानी दिल्लीमध्ये झालेल्या हिंसाचाराचा (Delhi Violence) आरोपी उमर खालिदच्या (Omar Khalid) विरोधात दिल्ली पोलिसांच्या (Delhi Police) क्राईम ब्रँचनं गुरुवारी चार्जशीट दाखल केली. सुमारे 100 पानांची ही चार्जशीट असून यामध्ये उमरच्या विरुद्ध दंगल भडकावणे, दंगलीचा कट रचणे, देशविरोधी भाषण करणे यासह गंभीर आरोप दाखल करण्यात आले आहेत.

काय आहे चार्जशीटमध्ये?

‘दिल्लीतील शाहीन बागमध्ये (Shaheen Bagh) 8 जानेवारी रोजी उमर खालिद, खालिद सैफी, आणि ताहीर हुसेन यांच्यामध्ये बैठक झाली. या बैठकीत दिल्लीतील दंगलीचा कट रचण्यात आला. CAA च्या विरोधात आंदोलन करणाऱ्यांना चिथवण्यासाठी उमरनं अनेक राज्यांचा दौरा केला. मध्य प्रदेश, बिहार, राजस्थान आणि महाराष्ट्रात झालेल्या CAA विरोधी आंदोलनात तो सहभागी होता. यावेळी त्यानं चिथावणीखोर भाषणं केली,’ असा आरोप या चार्जशीटमध्ये करण्यात आला आहे. ‘उमरनं ज्या राज्यांचा प्रवास केला तेथील त्याची सर्व व्यवस्था ही आंदोलन करणाऱ्या कार्यकर्त्यांनी केली होती,’ अशी माहिती देखील यामध्ये देण्यात आली आहे.

(हे वाचा-NEW YEAR : Jio धारकांसाठी मोठी बातमी! 1 जानेवारीपासून सर्व कॉल मोफत)

चार्जशीटमध्ये एक नवं नाव

दिल्ली पोलिसांच्या क्राईम ब्रँचनं दाखल केलेल्या चार्जशीटमध्ये उमर खालिदच्या सर्व सहकाऱ्यांच्या नावाचीही माहिती देण्यात आली आहे. या यादीत एका नव्या नावाचाही गौप्यस्फोट करण्यात आला आहे. राहुल राय असं या व्यक्तीचं नाव आहे. राहुलनं ‘दिल्ली सपोर्टर प्रोटेस्ट’ असा व्हॉट्सअप ग्रुप बनवला होता. या ग्रुपच्या माध्यमातून दिल्लीतील हिंसाचाराचं नियोजन करण्यात आलं होतं. उमरवर नुकतीच बेकायदेशीर प्रतिबंध कायदा (UPAA) च्या अन्वये देखील दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलनं चार्जशीट दाखल केली आहे.

(हे वाचा-पुण्यात एल्गार परिषद होणारच, बी.जी. कोळसे पाटलांनी जाहीर केली नवी तारीख)

23 ते 26 फेब्रुवारी दरम्यान झाली होती दंगल

दिल्लीच्या पूर्वोत्तर जिल्ह्यात 23 ते 26 फेब्रुवारीमध्ये दंगल झाली होती. याच काळात 24 आणि 25 फेब्रुवारी असे दोन दिवस अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प भारत दौऱ्यावर होते.  दिल्लीमध्ये झालेल्या दंगलीत 53 जण ठार झाली होती. तसेच या दंगलीमध्ये खासगी आणि सार्वजनिक संपत्तीचंही मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं. त्यानंतर या प्रकरणात सप्टेंबर महिन्यात उमरला अटक करण्यात आली होती.

First published:

Tags: Delhi