LIVE NOW

LIVE Delhi Violence: दिल्ली हिंसाचारात आतापर्यंत 27 जणांचा मृत्यू; पोलिसांचं अटकसत्र सुरू

दिल्लीच्या काही भागात गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या हिंसाचारात बळींची संख्या वाढत आहे.

Lokmat.news18.com | February 26, 2020, 10:18 PM IST
facebook Twitter Linkedin
Last Updated February 26, 2020
auto-refresh

Highlights

Load More
नवी दिल्ली, 26 फेब्रुवारी : दिल्लीच्या काही भागात गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या हिंसाचारात बळींची संख्या वाढत आहे. सुधारित नागरिकत्व कायद्याच्या (CAA) विरोधात सुरू असलेल्या आंदोलनानं हिंसक वळण घेतलं आणि दिल्लीचा ईशान्य भाग पेटला. अजूनही अनेक भागात तणावाचं वातावरण आहे. दगडफेक, जाळपोळ, हिंसाचार सुरू आहे. 56 पोलिसांसह 200 जण जखमी असल्याची माहिती आहे. पोलिसांनी अटकसत्र सुरू केलं आहे. दिल्लीत निमलष्करी दल तैनात करण्यात आलं आहे. विरोधी पक्षांनी सरकारवर निशाणा साधला आहे.