कोण आहे कपिल मिश्रा? या नेत्यावर आहे दिल्लीची दंगल भडकवण्याचा आरोप

कोण आहे कपिल मिश्रा? या नेत्यावर आहे दिल्लीची दंगल भडकवण्याचा आरोप

दिल्लीमध्ये शाहीनबाग मध्ये सुरू असलेल्या आंदोलनाच्या संदर्भात आणि एनआरसी च्या मुद्यावरून मिश्रा यांनी यापूर्वी सुद्धा आक्रमक अशा प्रकारची विधानं केली होती.

  • Share this:

दिनांक 26 फेब्रुवारी, नवी दिल्ली : कपिल मिश्रा, ही तीच व्यक्ती आहे... दिल्लीची दंगल भडकवण्यासाठी कारणीभूत, चिथावणीखोर भाषा, धार्मिक भावना भडकवणे असे आरोप या व्यक्तीवर केले जात आहेत. कपिल मिश्रा भाजप नेते. खरं तर आम आदमी पार्टीचे ते कार्यकर्ते होते. पण मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केल्यानंतर मिश्रा यांना पक्षातून काढून टाकण्यात आलं. पुढे कपिल मिश्रा यांनी भाजपात प्रवेश केला.

'आप'मध्ये काम करण्यापूर्वी मिश्रा यांनी काही सामाजिक संघटनांच्या माध्यमातून शिक्षण विषयात काम केलं होतं. भाजपात आल्यानंतर कपिल मिश्रा त्यांच्या आक्रमक स्वभावामुळे चांगलेच चर्चेत राहिले. दिल्लीमध्ये शाहीनबाग मध्ये सुरू असलेल्या आंदोलनाच्या संदर्भात आणि एनआरसी च्या मुद्यावरून मिश्रा यांनी यापूर्वी सुद्धा आक्रमक अशा प्रकारची विधान केली होती. चार दिवसांपूर्वी कपिल मिश्रा यांनी जाहीरपणे 'पोलिसांनी पुढच्या तीन दिवसात या लोकांना हटवावं अन्यथा रस्ता कसा मोकळा करायचा हे आम्हाला माहीत आहे, आम्ही रिकामा करू,' अशी भूमिका घेतली होती.

दिल्ली निवडणुकांनंतर गुत्पचर यंत्रणेने काय माहिती दिली, त्यावर कारवाई का करण्यात आली नाही?

एफआयआर दाखल करण्याचे आदेश

दिल्लीच्या उच्च न्यायालयाने अखेर सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांना पोलिसांना कपिल मिश्रा आणि प्रक्षोभक भाषणं करणाऱ्यांवर FIR दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. तर गुरुवारी दुपारपर्यंत पोलिस आयुक्तांनी आपला लिखित जबाब नोंदवावा असे आदेश सुद्धा न्यायालयाने दिला आहेत. दोन दिवसातल्या हिंसाचारात दिल्लीमध्ये आतपर्यंत 24 जण मृत्युमुखी पडले आहेत. असं असलं तरीही कपिल मिश्रा यांचा आक्रमकपणा कायम असल्याचं दिसत आहे. कारण रस्ता खुला करणं हा आमचा अधिकार असल्याचं त्यांनी पुन्हा एकदा ट्विटरवरून म्हटलंय.

पण हा TWEET वादग्रस्त होत असल्याचं लक्षात येताच कपिल मिश्रा याने हे ट्वीट डिलीट करून टाकलं. दरम्यान अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प भारतात असेपर्यंत पंतप्रधान, गृहमंत्री यांनी दिल्लीतल्या अशांत वातावरणाबद्दल कोणतंही विधान करायचं टाळलं होतं. पण बुधवारी शेवटी पंतप्रदान मोदी यांनी दिल्लीकरांना शांततेचं आवाहन केलं. तर मंगळवरी रात्री उशिरा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन अतिरिक्त अधिकार असलेल्या एस.पी. यांची नियुक्ती केली. तर बुधवारी संध्याकाळी देशाचे सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी दिल्लीतल्या दंगल प्रभावित भागातून पायी दौरा केला. पोलिसांवर विश्वास ठेवा, शांतता पाळा, आपल्या भावनांना आवर घाला, आपल्या सगळ्यांना मिळून दिल्लीत शांतता राखायची आहे असं डोवल यांनी लोकांना वैयक्तिक भेटून सांगितलं.

अन्य बातम्या

दिल्ली जळत असताना राहुल गांधी कुठे आहेत? कार्यसमितीच्या बैठकीला अनुपस्थित

दिल्ली हिंसाचारावरून अवघड प्रश्न विचारताच उठून गेले प्रकाश जावडेकर

‘फोटो काढू नका, फक्त हिंसाचाराची मजा घ्या’, पत्रकाराने सांगितला दिल्लीचा अनुभव

First published: February 26, 2020, 9:25 PM IST

ताज्या बातम्या