मराठी बातम्या /बातम्या /देश /

'इकडे ये पाकिस्तानी, तुला नागरिकत्व देतो', संतप्त जमावाने BSF च्या जवानाचे घर जाळलं

'इकडे ये पाकिस्तानी, तुला नागरिकत्व देतो', संतप्त जमावाने BSF च्या जवानाचे घर जाळलं

'इकडे ये पाकिस्तानी, तुला नागरिकत्व देतो’ अशा घोषणा देत संतप्त जमावाने बीएसएफ जवान मोहम्मद अनीस यांचे घर जाळले.

'इकडे ये पाकिस्तानी, तुला नागरिकत्व देतो’ अशा घोषणा देत संतप्त जमावाने बीएसएफ जवान मोहम्मद अनीस यांचे घर जाळले.

'इकडे ये पाकिस्तानी, तुला नागरिकत्व देतो’ अशा घोषणा देत संतप्त जमावाने बीएसएफ जवान मोहम्मद अनीस यांचे घर जाळले.

  • Published by:  Sandip Parolekar

नवी दिल्ली,28 फेब्रुवारी:उत्तर-पूर्व दिल्लीत उसळलेल्या हिंसाचारातील आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. 'इकडे ये पाकिस्तानी, तुला नागरिकत्व देतो’ अशा घोषणा देत संतप्त जमावाने बीएसएफ जवान मोहम्मद अनीस यांचे घर जाळले. जमावाने एक गॅस सिलिंडर मोहम्मद अनीस यांच्या घरात फेकला. यावेळी मोहम्मद अनीस यांचे कुटुंबीय घरात होते. खजुरी खास परिसरात 25 फेब्रुवारीला ही घटना घडली. दरम्यान, मोहम्मद अनीस 2013 मध्ये बीएसएफमध्ये भर्ती झाले होते. तीन वर्ष त्यांनी जम्मू काश्मीरमध्ये कर्तव्य बजावत सीमेचे रक्षण केले.

घरावरील नावाची पाटी पाहून आंदोलक थांबले...

याबाबत मिळालेली माहिती अशी की, खजुरी खास परिसरात 25 फेब्रुवारीला आंदोलक तोडफोड आणि जाळपोळ करत होते. जवान मोहम्मद अनीस यांच्या दोन मजली घरावरील नावाची पाटी पाहून आंदोलक थांबले. बीएसएफ जवान मोहम्मद अनीस अशा नावाची पाटी पाहून जमावाने आधी त्यांच्या घराबाहेरील गाड्या जाळल्या. यानंतर काही मिनिटं त्यांच्या घरावर दगडफेक केली. यावेळी घरात मोहम्मद अनीस यांच्यासह अनीस, वडील मोमम्मद मुनीस, काका मोहम्मद अहमद आणि 18 वर्षीय चुलत बहीण नेहा परवनी घरात होते.

दिल्ली हिंसाचारानंतर भडकली 'दंगल गर्ल'; आंब्याच्या प्रश्नाऐवजी शांत झोप कशी लागते विचारा', मोदींसह, अक्षय कुमारलाही टोला

हिंदु बांधवांनी केली मदत..

दिल्लीतील खजुरी खास परिसर हिंदूं बहुल आहे. मोहम्मद अनीस यांच्या घरावर हल्ला झाल्यानंतर त्यांच्या शेजारी राहणाऱ्या हिंदूंनी जमावाला निघून जाण्यास सांगितले. पेटवण्यात आलेली वाहने त्यांनी विझवण्याचा प्रयत्न केली.परंतु तोपर्यंत मोहम्मद अनीस यांचे घर जळून खाक झाले होते. अनीस यांच्या कुटुंबाचे खूप मोठे नुकसान झाले आहे. जमावाने या परिसरातील एकूण 35 घरे जाळली.

अनीस यांचे मे महिन्यात लग्न..

मोहम्मद अनीस यांनी आयुष्यभराची कमाई घरात ठेवली होती. येत्या एप्रिलमध्ये अनीस यांच्या बहिणीचे तर मे महिन्यात स्वत: अनीस यांचे लग्न होणार होते. लग्नासाठी ठेवलेले तीन लाख रुपये आणि सोन्याचे दागिने गायब झाल्याचे त्यांच्या कुटुंबीयांनी सांगितले.

कोयत्याने वार करून केले अक्षरश: तुकडे, तरुणाच्या हत्येचा भयंकर VIDEO

First published: