नवी दिल्ली, 07 मार्च : ईशान्य दिल्लीतील हिंसाचाराचं प्रसारण दाखवणाऱ्या दोन चॅनल्सवर माहिती व प्रसारण मंत्रालयानं 48 तासांसाठी बंदी घातली आहे. दोन्ही चॅनेलचे प्रसारण 6 मार्च संध्याकाळी 7.30 वाजल्यापासून बंद करण्यात आले आहे. आता 8 मार्चला सायंकाळी 7.30 वाजल्यापासून या दोन्ही चॅनल्स टेलीकास्ट पुन्हा सुरू होणार आहे. CAA आणि NRC विरोधात झालेल्या हिंसाचाराचं कव्हरेज ह्या दोन्ही चॅनल्सनी एकतर्फी प्रसारीत केलं होतं असं माहिती व प्रसारण मंत्रालयाने म्हटलं आहे. त्यामुळे या दोन मल्याळम् चॅनल्सवर 48 तासांची बंदी घालण्यात आली आहे.
मीडिया वन टीव्ही आणि एशियंट न्यूज चॅनल्स या दोन वाहिन्यांवर केंद्र सरकारकडून बंदी घालण्यात आली आहे. ईशान्य दिल्लीत झालेल्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर माहिती व प्रसारण मंत्रालयाकडून एक प्रेसनोट जारी कऱण्यात आली होती. यामध्ये चॅनल्स आणि वृत्तपत्र, सोशल मीडियावर हिंसाचाराला खतपाणी देणारे किंवा भडकवणारे संदेश असतील तर कारवाई कऱण्यासंदर्भात माहिती देण्यात आली होती. मात्र या दोन्ही चॅनल्सनी या प्रेसनोटला केराची टोपली दाखवत प्रसारण केल्यानं केंद्र सरकारकडून या दोन चॅनल्सवर बंदी घालण्यात आली आहे.
हे वाचा-मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज अयोध्या दौऱ्यावर, शरयूची आरती रद्द
मुस्लीमबहुल दिल्लीच्या चांद बागेत या हिंसाचाराच्या बर्याच बातम्या या वाहिनीने प्रसारित केल्या होत्या. प्रसारणादरम्यान, चॅनेलने दगडफेक, जाळपोळ आणि जखमींना रुग्णालयात नेण्याचे वृत्तही दाखवलं होतं. या अहवालांमुळे हिंसाचार वाढू शकला असता आणि कायदा व सुव्यवस्थेला धोका निर्माण झाला असता. जेव्हा परिसरातील स्थिती अधिकच अस्थिर होती तेव्हा हे प्रसारण दाखवल्याचा आरोप माहिती व प्रसारण मंत्रालयानं केला आहे.
तर अशा पद्धतीनं बंदी घातल्याचा निषेध या दोन्ही वाहिन्यांनी केल्या आहे. स्क्रीनवर काळ्यारंगाची चित्रफित दाखवून हा निषेध केला आहे. हा निर्णय म्हणजे माध्यमांच्या स्वतंत्र्यावर आणलेली गदा आहे. माध्यमांच्या स्वातंत्र्याची ही गळचेपी नाही का? असंही या वृत्त वाहिन्यांची सवाल उपस्थित केला आहे.
केबल टेलिव्हिजन नेटवर्क नियम 1994 अंतर्गत दोन नियमांचे कारण सांगून दोन्ही वाहिन्यांवर बंदी घालण्यात आली आहे. त्याचबरोबर केरळ युनियन ऑफ वर्किंग जर्नालिस्टने दोन्ही वाहिन्यांवरील बंदीचा निषेध जाहीर केला आहे.
हे वाचा-रिक्षा चालवून संसार उभारला, काही क्षणात आगीने केली राखरांगोळी!