दंगलखोरांनी 19 वर्षीय युवकाच्या डोक्यात खुपसलं ड्रिलमशीन, पाहा अंगावर काटा आणणारा PHOTO

दंगलखोरांनी 19 वर्षीय युवकाच्या डोक्यात खुपसलं ड्रिलमशीन, पाहा अंगावर काटा आणणारा PHOTO

सध्या या तरुणावर दिल्लीतील जीटीबी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्याच्या प्रकृतीमध्ये सुधारणा होत आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 26 फेब्रुवारी : ईशान्य दिल्ली दोन दिवसात धगधगत असून नागरिकत्व दुरुस्ती कायद्याच्या (सीएए) हिंसाचारात आतापर्यंत 18 जणांचा मृत्यू झाला आहे. तर तिथे झालेल्या हिंसाचारामुळे अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत. याच दरम्यान एका 19 वर्षीय युवकाच्या दुकानावर हल्ला करण्यात आला. या हल्ल्यावेळी 19 वर्षीय युवकाच्या डोक्यात ड्रिलमशीन गेल्यानं तो गंभीर जखमी झाला आहे. या युवकाच्या एक्स-रेचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. 19 वर्षीय युवकाच्या डोक्यात ड्रिलमशीन गेल्याचा धक्कादायक प्रकार दिल्लीत घडला. त्याचे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. हा युवक काम करत असताना अचानक त्याच्या दुकानावर हल्ला झाला आणि त्या झटापटीत युवकाच्या ड्रिलमशीन मशीन घुसलं. हे ड्रिलमशीन इतक्या जोरात घुसलं आहे की त्याच्या कवटीला भेदून आत गेल्याचं एक्स-रेमधील फोटोमध्ये दिसत आहे. हा फोटो अंगावर काटा आणतो.

त्या दुकानात उपस्थित असलेल्यांनी या तरुणाला तातडीनं जीटीबी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं. या तरुणाच्या टेस्ट करून त्याच्यावर उपचार सुरू करण्यात आले आहेत. मंगळवारी शस्त्रक्रिया करून या तरुणाच्या डोक्यातून ड्रिलमशीनचा तुकडा काढण्यात आला आहे. तर डॉक्टरांनी रिपोर्टवरून दिलेल्या माहितीनुसार दंगलखोरांनी त्या तरुणाच्या डोक्यातच ड्रिलमशीन घातलं असावं, असं एक्स रे च्या रिपोर्टमध्ये दिसत असल्याचं म्हटलं आहे.

या तरुणाची प्रकृती सध्या स्थिर असल्याची माहिती मिळत आहे. त्याच्या प्रकृतीमध्ये सुधारणा होत असल्याची माहिती जीटीबी रुग्णालयातील डॉक्टरांनी दिली आहे. दिल्लीतील हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर ईशान्य दिल्लीमध्ये सगळ्या शाळा बंद, बोर्डाच्या परीक्षाही रद्द करण्यात आल्या आहेत. दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया म्हणाले की, हिंसाग्रस्त उत्तर पूर्व दिल्लीतील सर्व सरकारी आणि खासगी शाळा बुधवारी बंद राहतील. बोर्डाच्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. सिसोदिया यांनी सीबीएसईला बुधवारी होणारी बोर्ड परीक्षा तहकूब करण्याची विनंती केली होती. त्यानंतर सीबीएसईने बुधवारी होणाऱ्या बोर्डाच्या परीक्षा पुढे ढकलल्या आहेत.

First published: February 26, 2020, 11:07 AM IST

ताज्या बातम्या